

Squadron Leader Saanya
esakal
भारतीय हवाई दलाच्या महिला वैमानिकांनी पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. स्क्वॉड्रन लीडर सान्या या प्रतिष्ठित ‘कॅटेगरी-ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ ही पात्रता मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवून स्क्वॉड्रन लीडर सान्या यांनी एक नवा पायंडा रचला आहे, कारण आजही हवाई दलाच्या सर्वोच्च श्रेणीत पोहोचणाऱ्या महिलांचे प्रमाण मर्यादित आहे.
अ) हवाई दलात प्रवेश : त्या २० जून २०१५ रोजी हवाई दलाच्या ‘४२व्या एसएससी (डब्ल्यू) एफपी’चा भाग म्हणून फ्लाइंग ब्रान्चमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
ब) पदोन्नतीचा प्रवास :
२०१७ मध्ये ‘फ्लाइट लेफ्टनंट’ पदी बढती.
२०२१ मध्ये ‘स्क्वॉड्रन लीडर’ पदी बढती.
क) ऐतिहासिक कामगिरी : विमान उड्डाण प्रशिक्षकांच्या सर्वोच्च श्रेणीतील ‘कॅट-ए क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ (QFI) ही पात्रता मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला लष्करी वैमानिक ठरल्या आहेत.