

Aravalli Range Protection
esakal
अरावली ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते आणि दिल्ली एनसीआरसह उत्तर पश्चिम भारतासाठी संरक्षक भिंत म्हणून काम करते. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने १०० मीटरपेक्षा जास्त उंच भूभागालाच अरावली म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सुमारे ९० टक्के क्षेत्र संरक्षणाच्या कक्षेबाहेर जाण्याची भीती व्यक्त झाली आहे. हा प्रश्न केवळ कायदेशीर नसून पर्यावरणीय न्याय, पिढीजात न्याय आणि जबाबदार शासन या नैतिक मूल्यांना थेट स्पर्श करतो.