Premium|Study Room : बांगलादेशात झालेले सत्तांतर भारतासाठी चिंतेची बाब ठरेल का?

Bangladesh Election Results 2026 : बांगलादेशमध्ये सत्ताबदल झाला असून तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीचे सरकार सत्तेत आले आहे; शेख हसीना युगाचा अंत आणि नव्या लोकशाही अध्यायाची सुरुवात भारत-बांगलादेश संबंधांसाठी नवी आव्हाने आणि संधी घेऊन आली आहे.
Bangladesh Election Results 2026

Bangladesh Election Results 2026

esakal

Updated on

लेखक : वैभव खुपसे

बांगलादेशमधील अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीने देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण वळण आणले आहे. २०२४ मधील जनआंदोलनानंतर झालेली ही पहिली राष्ट्रीय निवडणूक होती. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून या पक्षाचे प्रमुख तारिक रहमान (बेगम खालिद झिया यांचे पुत्र) यांची पंतप्रधान पदी नियुक्ती झाली, तर जमात-ए-इस्लामी आघाडीनेही उल्लेखनीय कामगिरी केली. सुमारे ५९ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली, जी मागील काही निवडणुकांच्या तुलनेत जास्त होती. या निकालाने केवळ सत्तांतर घडवले नाही, तर राजकीय संक्रमणाच्या प्रक्रियेला वैधता दिली.

ही निवडणूक म्हणजे केवळ एका पक्षाचा विजय नाही; ती एका कालखंडाचा अंत आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून ‘नियंत्रित लोकशाही’चा आरोप होत होता. विरोधी पक्षांची अटक, संशयास्पद निवडणूक प्रक्रिया, नागरी स्वातंत्र्यावर बंधने आणि सत्तेचे केंद्रीकरण या मुद्द्यांमुळे असंतोष वाढत गेला. २०२४ मधील युवक-आधारित आंदोलनानंतर परिस्थिती बदलली आणि अखेर सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com