

Indian Parliamentary Democracy
esakal
लेखक : महेश शिंदे
फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला लोकसभेत एका मोठ्या राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले, जेव्हा विरोधी पक्षांनी लोकसभाध्यक्ष (स्पीकर) ओम बिरला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला ११८ खासदारांची सही मिळाली असून, यामागे स्पीकरांच्या कथित पक्षपाती वर्तनाचा आरोप आहे. जसे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची पुरेशी संधी न देणे, खासदारांचे मोठ्या प्रमाणात निलंबन करणे आणि सदनाच्या कामकाजात एकांगी धोरण अवलंबणे.
ही घटना लोकसभेच्या इतिहासातील एक दुर्मीळ घटना आहे. ज्यामुळे संसदीय लोकशाहीतील स्पीकरच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ९ मार्च २०२६ रोजी या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण संसदीय व्यवस्थेची तटस्थता आणि पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करते.