

Sanchar Saathi App privacy
esakal
भारतात माहिती तंत्रज्ञान, मोबाईल वापर आणि इंटरनेट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि गोपनीयतेचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे.
२०१७ मधील न्यायमूर्ती के.एस. पुट्टस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले. हा हक्क अनुच्छेद २१ मधील जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काचा एक भाग मानला गेला आहे.