

Bondi Beach Terror Attack 2025
esakal
१४ डिसेंबर २०२५ रोजी सिडनीतील हनुक्का सणाच्या उत्सवावेळी बॉंडी बीच परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ऑस्ट्रेलियातील ज्यू समाज आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेला मोठा धक्का दिला. या घटनेने एकाकी किंवा कौटुंबिक अतिरेकी प्रवृत्तींमुळे निर्माण होणारा धोका, वाढते यहुदीविरोधी भाव, आणि बंदुक नियंत्रण कायद्यातील त्रुटी अधोरेखित केल्या. जरी ऑस्ट्रेलिया जगातील सर्वांत कडक शस्त्रनियंत्रण असलेला देश मानला जातो.