
दूरदृष्टीने निर्णय घेणे म्हणजे काय? तर्कशास्त्र आणि आतला आवाजही महत्वाचा
प्रस्तावना
दूरदृष्टी ठेवत निर्णय घेणे म्हणजे शहाणपणाचा शोध घेणे होय. हे केवळ ज्ञान किंवा बुद्धिमत्तेपुरते मर्यादित नाही, तर तर्कशास्त्र आणि आत्मविश्वास (आंतरिक भावना, अनुभव आणि दूरदृष्टी) यांच्या संयोजनातून याची निर्मिती होते. स्टीव्ह जॉब्स यांच्या आयफोन निर्मितीची कथा याचे उत्तम उदाहरण आहे. जॉब्स अभियंता नव्हते, पण त्यांना लोकांच्या अनुभवाची जाणीव होती. त्यांनी ही जाणीव टचस्क्रीन तंत्रज्ञान आणि अॅप इकोसिस्टमच्या तर्कशास्त्राशी जोडली आणि आयफोनसारखी क्रांतीकारी निर्मिती केली. केवळ तर्कशास्त्राने कदाचित सामान्य उपकरण बनले असते, तर केवळ अंतरज्ञानाने सुंदर पण अपूर्ण उदाहरण ठरले असते. पण या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित विचाराने एक मोठी क्रांती घडली.