
जून २०२५ रोजी एअर इंडियाचे AI-171 हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान अहमदाबाद येथून लंडनकडे उड्डाण करत असताना अवघ्या काही मिनिटांत मेघानीनगर परिसरातील रहिवासी व वैद्यकीय महाविद्यालय संकुलावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत २३० प्रवासी व ११ कर्मचारी मृत्युमुखी पडले. याशिवाय ३० नागरिकांचाही मृत्यू झाला.
हे केवळ आकस्मिकतेचे प्रकरण नव्हे तर भारतातील नागरी उड्डाण व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता, सार्वजनिक उत्तरदायित्व व नियामक संस्थांची कार्यक्षमता या सर्वच बाबींवर गंभीर आत्मपरीक्षणाची गरज निर्माण करणारी घटना आहे.