
१. बुद्धिबळ विश्वचषक विजेती - दिव्या देशमुख
नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतातील कोनेरू हम्पीला हरवून विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
दिव्या देशमुखने ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताबही पटकावला आहे.
विश्वचषक जिंकणारी दिव्या ही विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरी भारतीय असून, ग्रँडमास्टर किताब पटकावणारी चौथी भारतीय महिला ठरली आहे.