
sad moments
E sakal
श्रीकांत जाधव
‘शांत समुद्र कुशल नावाडी घडवत नाही’ ही म्हण प्रत्येक वेळी खरी ठरते. जीवनाचा प्रवास नेहमी गुळगुळीत नसतो. त्यात अपयश, हानी, वेदना, ताटातूट, फसवणूक अशा नकोशा प्रसंगांची मालिका येत राहते. परंतु याच कठीण क्षणांतून माणूस घडतो, विचार जागा होतो आणि भविष्याची वाट अधिक परिपक्वपणे समोर येते. मानवाचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात जितका वाटा यशाचा असतो तितकाच, किंबहुना अधिक, हा कटू क्षणांचा असतो. जे धडे आरामदायी परिस्थितीत कधीच मिळत नाहीत, ते हाडाला भिडणाऱ्या प्रसंगांतून शिकायला मिळतात.