
तुम्ही एका संस्थेच्या मानव संसाधन (Human Resources) विभागाचे प्रमुख आहात. एक दिवस ड्युटीवर असताना एका कामगाराचा मृत्यू होतो. मृत कामगाराच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र, तपासात हे स्पष्ट झाले की मृत्यूसमयी तो कामगार मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. परिणामी, कंपनीतील इतर कामगारांनी संप पुकारून मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष यांनी या प्रकरणात तुमच्याकडून शिफारस मागितली आहे.