
(लेखक : महेश शिंदे)
मागच्या आठवड्यात टॅरिफ वॉरच्या निमित्ताने भारत - अमेरिका संबंधांची एक काहीशी नकारात्मक बाजू आपण सर्वांनी अनुभवली. पण दोन्ही देशात एकीकडे शुल्कवाढीमुळे तणावाचे वातावरण असताना दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी मिळून अवकाशात झेपावलेल्या ऐतिहासिक निसार (NISAR) या उपग्रहाच्या निमित्ताने या संबंधांना वेगळे वळण दिले आहे. पृथ्वीवर हे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना आकाशात मात्र हे दोन्ही देश हातात हात घालून काम करत आहेत..