
मुकुंद होन, सरकारी कामगार अधिकारी (MPSC 2023)
मी मुकुंद होन. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. वडिलांप्रमाणे आपलं आयुष्यही लोकसेवेसाठीच असं वाटून मी IAS होण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न मी घेऊन बारावीत चांगले गुण मिळवले. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयासाठी प्रवेश घेत यूपीएससीची तयारीहा सुरू केली.