
सकाळ स्टडी रूमची प्रश्नमंजुषा
ई सकाळ
मानहानी कायदा, H-1B व्हिसा, लडाखचे आंदोलन, ‘कोल्ड स्टार्ट’ ड्रोन सराव, तापमान व्युत्क्रमण, पंडिता रमाबाई व रखमाबाई यांचे कार्य, तसेच संयुक्त राष्ट्र महासभेतील भारताची भूमिका अशा विषयांवरील नेमके ५० प्रश्न खास सकाळ स्टडी रुमच्या वाचकांसाठी
१. भारतीय न्याय संहितेच्या कोणत्या कलमानुसार मानहानी हा गुन्हा समजला जातो ?
१. कलम ३५४
२. कलम ३५६
३. कलम ३५८
४. कलम ३६०
२. मानहानी गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो?
१. खोट्या किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने प्रतिष्ठा कमी करणे
२. प्रत्यक्ष जखम करणे
३. आर्थिक नुकसान करणे
४. सार्वजनिक माहिती लपवणे