जैवविविधतेचे रक्षण, हवामान बदलाशी लढा आणि माणसाच्या जीवनशैलीतील टिकाऊपणाची गरज या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असते जलसाठ्यांचे संवर्धन. याच उद्देशाने ‘रामसर करार’ करण्यात आला होता, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणथळ प्रदेशांचे महत्त्व अधोरेखित करतो..भारताने या करारात घेतलेली भूमिका, नवीन रामसर स्थळांची भरती, Montreux Record सारख्या संवेदनशील यादीतील स्थळे – या सगळ्यांचा सखोल अभ्यास हा स्पर्धा परीक्षेतील निबंध, GS पेपर 3 व पर्यावरण विषयांच्या उत्तरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे..Premium|Study Room: MPSC आणि UPSC अभ्यासाची सुरूवात कशी करावी..? .राजस्थानमधील खीचन आणि मेणार या दोन जलसाठ्यांना २०२५ च्या जागतिक पर्यावरण दिनी रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला, त्यामुळे भारताची एकूण रामसर स्थळांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे भारतात आहेत. भारतातील पहिले रामसर स्थळ १ ऑक्टोबर १९८१ रोजी रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले ते खालीलप्रमाणे आहेत..चिलिका सरोवर (ओडिशा), केओलादेओ राष्ट्रीय उद्यान (राजस्थान).जून २०२५ पर्यंत तामिळनाडू मध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत ज्यांची संख्या २० एवढी आहे तर महाराष्ट्रात ३ रामसर स्थळे आहेत.जागतिक पर्यावरण दिन १९७३ पासून दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो आणि तो संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) नेतृत्वाखाली साजरा केला जातो. २०२५ सालची थीम आहे प्लास्टिक प्रदूषणावर मात करा (Beat Plastic Pollution)..रामसर करार काय आहे?रामसर करार हा एक सरकारी आंतरराष्ट्रीय करार आहे जो १९७१ साली इराणमधील रामसर शहरात करण्यात आला होता आणि १९७५ पासून अंमलात आला. भारताने १ फेब्रुवारी १९८२ रोजी या करारावर स्वाक्षरी केली. हा करार जगभरातील जलसाठ्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि त्यांना त्या स्वरूपात घोषित करतो. रामसर स्थळांना ''आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे जलसाठे'' असेही म्हटले जाते. कराराचे पूर्ण नाव: ''Convention on Wetlands of International Importance especially as Waterfowl Habitat''.Premium|Study Room: भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; काय आहेत यशामागील प्रमुख कारणं..?.या करारानुसार, जलसाठ्यांची व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आली आहे''दलदल, चिखलयुक्त भूभाग, स्फटिकयुक्त भूभाग (peatland) किंवा जलयुक्त क्षेत्र , नैसर्गिक किंवा कृत्रिम, कायमस्वरूपी किंवा हंगामी, स्थिर किंवा वाहणारे पाणी, गोड, खारट किंवा अर्धखारट अशा सागरी पाण्याच्या क्षेत्रासह जिथे भरतीच्या वेळी पाण्याची खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसते..रामसर स्थळांचे फायदेकरारात नमूद केले आहे की, ''मानवाच्या अस्तित्वासाठी जलसाठे (पाणथळ प्रदेश) अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जगातील सर्वात उपजाऊ पर्यावरणांपैकी एक असून जैवविविधतेचे उगमस्थान आहेत. असंख्य वनस्पती आणि प्रजातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे आणि उत्पादकतेचे स्त्रोत म्हणजे जलसाठे आहेत. जलसाठ्यांद्वारे मानव जातीला मिळणारे अनमोल फायदे किंवा ''इकोसिस्टम सेवा'' अनन्यसाधारण आहेत जसे की गोड्या पाण्याचा पुरवठा, अन्न आणि इमारतींसाठी साहित्य, जैवविविधता, पूर नियंत्रण, भूजल पुनर्भरण, आणि हवामान बदल कमी करणे इत्यादी. जे जीवनावश्यक आहेत..मोंत्रे रेकॉर्ड (Montreux Record)मोंत्रे रेकॉर्ड ही रामसर कराराअंतर्गत ठेवली जाणारी एक नोंदवही आहे. यात अशा रामसर स्थळांची नोंद केली जाते, जिथे मानव हस्तक्षेप, प्रदूषण किंवा इतर प्रतिकूल घटकांमुळे पर्यावरणीय स्थितीत बदल होतो आहे. याचा उद्देश म्हणजे या नाजूक अवस्थेतील जलसाठ्यांच्या संवर्धनाला प्राधान्य देणे.भारत आणि मोंत्रे रेकॉर्ड:२०२५ पर्यंत, भारताची दोन रामसर स्थळे मोंत्रे रेकॉर्डमध्ये आहेत : केओलादेओ नॅशनल पार्क (राजस्थान) : पाण्याची कमतरता व आक्रमक प्रजातीमुळेलोकतक तलाव (मणिपूर) : मानवी अतिक्रमण आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे(चिलिका तलाव याआधी मोंत्रे रेकॉर्डमध्ये होता, पण २००२ मध्ये यशस्वी पुनर्संचय झाल्याने त्यातून वगळण्यात आला)अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.