US Midterm Election 2026
Esakal
US Midterm Elections 2026: What Trump's Divided Government Means for India
अमेरिकेच्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रिपब्लिकन सरकार कायम आहे. त्यामुळे अमेरिकेत आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या हातात सत्ता असणार आहे. या परिस्थितीला Divided Government असे म्हणतात. ट्रम्प यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या धोरणांना संसदेतील विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
अमेरिकेच्या निवडणुकांचा निकाल लागताच भारताचा शेअर बाजार मात्र उसळी खाऊ लागला. तसेच सोन्याचे भाव देखील वाढले. अमेरिकेतील हा बदल केवळ त्या देशाच्या अंतर्गत राजकारणापुरता मर्यादित नाही. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या व्यापार, स्थलांतर, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांचा परिणाम भारतासारख्या देशांवरही होतो. विशेषतः भारत-अमेरिका संबंध सध्या व्यापार करार, तंत्रज्ञान सहकार्य, संरक्षण खरेदी आणि चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात होऊ घातलेले बदल या निमित्ताने समजून घेणे आणि त्यानुसार आपली धोरणं ठरवणं महत्त्वाचं आहे. या विशेष लेखाच्या माध्यमातून नेमकं हेच सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया..