
भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी, प्रश्नांसाठी झटणाऱ्या विद्वान स्त्रिया- पंडिता रमाबाई सरस्वती आणि रखमाबाई राऊत
ई सकाळ
लेखक : विपुल वाघमोडे
पंडिता रमाबाई : स्त्रीशक्तीचा प्रखर आवाज
भारतीय समाजाच्या नवजागरण काळात जिथे पुरुष सुधारकांचे वर्चस्व होते तिथे एक स्त्री उभी राहत ‘स्त्रियांच्याच समस्यांसाठी स्त्रियांनीच आवाज उठवावा’ हा धाडसी विचार मांडते, ती स्त्री म्हणजे पंडिता रमाबाई सरस्वती (१८५८–१९२२). त्यांच्या कार्यामुळे भारतीय स्त्री प्रश्नांना राष्ट्रीय चळवळीइतकीच सामाजिक व राजकीय मान्यता मिळाली.