

How to Uphold Values at the Workplace – A Case of Seema the Architect
E sakal
Workplace Ethics Case Study : Respect, Gender Bias & Transparency at Work
लेखक : अभिजित मोदे
सीमा नावाच्या एका नवीन महिला आर्किटेक्चरने मॅंचेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर, यूकेमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या विभागात सीनिअर आर्किटेक्ट म्हणून प्रवेश केला.
प्रकल्पाबाबत ब्रीफिंग दरम्यान, सीमाने काही सूचना मांडल्या ज्या प्रकल्पासाठी फायद्याच्या ठरल्या असत्या आणि पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळही कमी केला असता.
यामुळे, चीफ आर्किटेक्ट अस्वस्थ झाले आणि त्यांना वाटू लागले की, सर्व श्रेय सीमालाच मिळेल. त्यानंतर, त्यांनी सीमाबद्दल निष्क्रिय आक्रमक वर्तन अवलंबले आणि तिच्याशी अवमानकारकपणे वागायला सुरुवात केली.
सीमा लज्जित झाली कारण चीफ आर्किटेक्ट कोणतीही संधी न दवडता तिला कमीपणा आणायचे. ते अनेकदा तिच्या सहकाऱ्यांसमोरच तिला दुरुस्त करत आणि तिच्याशी मोठ्याने बोलत. सततच्या या त्रासामुळे सीमाचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी झाला आहे. ती कायम तणावात, चिंतेत आणि दबावाखाली राहू लागली.
तुम्हाला तिच्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि करिअर कामगिरीबद्दल माहिती आहे. मात्र, हा छळ तिच्या या महत्त्वाच्या प्रकल्पातील आवश्यक योगदानावर मर्यादा आणू शकतो आणि तिच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, अशी भीती वाटते. तिच्या सहकाऱ्यांपासून तुमच्या लक्षात आले की, सीमा राजीनामा देण्याचा विचार करत आहे.