

From Teaching to Strawberry Farming
esakal
व्यक्ती विशेष
ZT Lalrithangi : स्ट्रॉबेरीच्या शेतीतून थेट जगाच्या नकाशावर
मिझोराममधील एका दुर्गम भागातील संगाऊ गावातील ३५ वर्षीय ZT Lalrithangi (ज्यांना 'Pi Mari-i' म्हणूनही ओळखले जाते) यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या, परंतु यश मिळाले नाही. अखेर, पारंपारिक नोकरीचा अट्टाहास सोडत त्यांनी शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला.
शेतीतील यशस्वी प्रयोग आणि भरघोस उत्पन्न
सुरुवात : २०२४ मध्ये त्यांनी अवघ्या १,००० स्ट्रॉबेरी रोपांपासून या प्रयोगाची सुरुवात केली.
पहिला टप्पा : पहिल्याच वर्षी त्यांना सुमारे दीड लाखांचे उत्पन्न मिळाले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी शेतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
यश : आज दोन हेक्टर क्षेत्रावर १० हजारांहून अधिक स्ट्रॉबेरीची रोपे जोपासली असून, २०२५ मध्ये या शेतीतून त्यांना १० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
जागतिक सन्मान
फक्त ताज्या फळांची विक्री न करता, त्या स्ट्रॉबेरीपासून वाइनसारखी मूल्यवर्धित उत्पादने देखील तयार करतात.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अन्न आणि कृषी संघटनेने जगभरातील ६०० हून अधिक नामांकनांमधून निवडलेल्या १०० 'Women Heroes' मध्ये त्यांचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे, या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणाऱ्या भारतात फक्त दोन व्यक्ती आहेत त्यातील हा मान मिळवणाऱ्या पहिल्या मिझो व्यक्ती ठरल्या आहेत.
=============================================================
नोकरी अड्डा
SSC CHSL भरती २०२६
एकूण जागा : २५३६
पदांची नावे :
डेटा एंट्री ऑपरेटर / डीईओ ग्रेड 'A'
कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
पद १ साठी : १२ वी उत्तीर्ण (गणित विषय असावा).
पद २ साठी : १२ वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२६ रोजी वय १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत).
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क: खुला किंवा ओबीसी प्रवर्गासाठी १०० रुपये (महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांना फी नाही).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत).
अर्ज दुरुस्तीची मुदत: १४ ते १६ ऑक्टोबर २०२६.
संकेतस्थळ - https://ssc.gov.in/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.