
News : 2 ऑगस्ट... आजही अनेक कोकणवासीयांना धक्का देणारी काळरात्र. अमावस्येचा काळाकुट्ट अंधार, पावसाचं तांडव आणि याच परिस्थितीत सावित्री नदीला आलेल्या पुराने अनेकांना जलसमाधी दिली. आजही या घटनेच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात.
आज इंद्रायणी नदीवरील कुडमाला पूल कोसळला. 20-25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यातच पुन्हा एकदा सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.