भटकंती : अंधारबनचा रोमांचक ट्रेक...

मयूर जितकर
Friday, 22 May 2020

काय पाहाल?
भिरा धरणाचे बॅकवॉटर
प्लस व्हॅली
आकर्षक धबधबे (फक्त पावसाळ्यात)

कसे जाल?
पुणे - पिरंगुट - मुळशी - 
ताम्हिणी घाट - पिंपरी

काय काळजी घ्याल?
अंधारबनचा ट्रेक सरळदिशेत असल्याने शेवटपर्यंत चालण्याची तयारी ठेवावी. सकाळी लवकर ट्रेक सुरू करावा.
शक्यतो खासगी ट्रेकर्सच्या मदतीने हा ट्रेक करावा. बाजूची दरी व जंगलातील साप, किटकांबद्दल ते सावध करू शकतात.
जंगलातील ट्रेक असल्याने पायात ट्रेकिंग शूजही हवेतच.

लॉकडाउनच्या सध्याच्या काळात आपण विविध ठिकाणांची माहिती घेत आहोत. लवकरच लॉकडाउन संपून आपले जीवन पूर्वपदावर येईल, अशी बाळगूया. आपल्या देशाचा पश्चिम घाट म्हणजे जैवविविधता, निसर्गसौंदर्याचा खजिनाच. सह्याद्री पर्वतरांग याच घाटाचा भाग. ताम्हिणी घाटाच्या मध्यभागापासून १३ किलोमीटर अंतरावरील अंधारबन घनदाट जंगलामुळे प्रसिद्ध आहे. येथील जंगल इतके दाट आहे की, वृक्षवेलींच्या सावलीमुळे काहीसा अंधार निर्माण होतो. यावरूनच ‘अंधारबन’ हे नाव पडले असावे. विशेषत: पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी निसर्गप्रेमी, पर्यटक आवर्जून अंधारबनला भेट देतात. पुण्यापासून जवळ असल्यामुळे वीकएंड ट्रेकिंगसाठीही ते लोकप्रिय आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्याबरोबरच मुंबईकरांसाठीही हा सोयीचा, एक दिवसात होणारा ट्रेक आहे. दाट जंगलात ताम्हिणी घाटाला समांतर असणाऱ्या दरीतून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची मजा वेगळीच. पावसाळ्यात कोसळणारे धबधबे शीण नाहिसा करून मन प्रसन्न करतात, पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. हा ट्रेक पिंपरी धरणापासून सुरू करावा. अंधारबनची सुरवात होताच प्रकाश कमी होत असल्याचे लक्षात येते. झाडांच्या फांद्यामधून वरील आकाश मोहक दिसते.

अंधारबनचा ट्रेक भिरा धरणापाशी संपतो, हे धरण कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे. अंधारबनचा ट्रेक तसा सोपा असला, तरी घनदाट जंगलामधून चालावे लागत असल्याने दमविणारा आहे. त्यामुळे, येथे फिरताना पाण्याची बाटली, एनर्जी ड्रिंक सोबत ठेवावे. ते अधूनमधून प्यावे. त्यामुळे, थकवा कमी होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mayur jitkar on andharban treak