सोलो ट्रॅव्हलर : माणुसकीचे अलौकिक दर्शन

शिल्पा परांडेकर
Saturday, 14 March 2020

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे,’ ही प्रतिज्ञा तर आपण सर्वांनी लहानपणापासून घेतली आहे. पण आपल्या देशातली विविधता, समृद्धता, माणुसकी कधी खरंच अनुभवावी असा विचार कधी केला का? राखीने सलग ३६५ दिवस एकटीने प्रवास करून हे अनुभवले!

नाव : राखी सखाराम कुलकर्णी
वय : २९
गाव : पुणे
व्यवसाय : पुण्यातील ‘डिबेंचर ट्रस्टी कंपनी’मध्ये कार्यरत 

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे,’ ही प्रतिज्ञा तर आपण सर्वांनी लहानपणापासून घेतली आहे. पण आपल्या देशातली विविधता, समृद्धता, माणुसकी कधी खरंच अनुभवावी असा विचार कधी केला का? राखीने सलग ३६५ दिवस एकटीने प्रवास करून हे अनुभवले!

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हा विचार काही अचानक नाही आला. पाँडेचरीसारखा सुंदर प्रवास लगेच आटोपून परत जावे लागण्याची खंत तिला शांत बसू देईना. मग विचार आला ‘भारत भ्रमंतीचा’. एक वर्ष तिने प्रवासाचे नियोजन, आर्थिक बाबी व पालकांची मानसिक तयारी करण्यासाठी दिले. 
राखीच्या अनुभवांची शिदोरी नक्कीच खूप मोठी आहे. ‘प्रवासाने माणूस बदलतो का हे नाही माहीत, परंतु तुम्हाला तुमचे ‘२.० version’ जरूर मिळेल. प्रवासादरम्यान माझ्यात अनेक सकारात्मक बदल घडले. जसे की, आपण एखादी अडचण सोडवू शकत असू, तर त्याचा अधिक विचार न करता ती सोडवावी. मी जेव्हा ठिकाणे, लोक, परिस्थितीचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर जाणवले की, माध्यमांच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात त्यापेक्षा आपला देश निश्‍चितच खूप वेगळा आहे. माणुसकीचे अलौकिक दर्शन मला या प्रवासात घडले. कोणतेही भेदभाव न मानता लोक मदतीसाठी तयार असतात.तिने या प्रवासात पर्यटनासोबतच सामाजिक सेवा केली. प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, कागदी पिशव्या तयार करणे याचे प्रशिक्षण ठिकठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना दिले. या प्रवासामुळे तिने स्वतःदेखील चॉकलेट, बिस्कीट वगैरे प्लॅस्टिक आवेष्टनातील पदार्थ खाणे बंद केले, जेव्हा तिने ईशान्य भारतातील प्लॅस्टिकचे अनेक डोंगर पाहिले.

राखी सांगते, ‘खरंतर ३६५ दिवस, २९ राज्ये, २०० ठिकाणे आणि ४०,००० किलोमीटरचा प्रवास केला, तरी भारतातील इतकी संपन्न विविधता पाहण्यासाठी सलग किमान पाच वर्षे तरी हवीत. आता ती आशियाई देशांचा सलग सहा महिने प्रवास करण्याचा विचार करत आहे. 
तिच्या आगामी प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on rakhi kulkarni