हनिमून प्लॅनिंग करताय तर भारतातली 'ही' ऑफबीट ठिकाण आहेत खूप बेस्ट

best offbeat places in India when planning a honeymoon tourism marathi news
best offbeat places in India when planning a honeymoon tourism marathi news

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळेमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनावर बंधने घातली आहेत. त्यामुळे हनिमून प्लॅनिंग साठी  भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जे तुमचे हनुमान आणि तुमचे अनुभव पण खूप सुंदर आणि खास बनवू शकतात. भलेही मालदीव आणि स्वित्झरलँड तुमच्या हनिमूनच्या लिस्ट मध्ये असतील. मात्र भारतात अशी काहीऑफबीट  ठिकाण आहेत जिथे फिरायला गेल्यानंतर तुम्हाला स्वर्गापेक्षा अधिक सुख वाटेल. रोमांटिक होण्याबरोबर तुम्हाला खास हनिमून बनवण्यासाठी ही ठिकाणे खूप चांगली आहेत. प्लॅनिंग करून या ठिकाणी एकदा तुम्ही नक्कीच जाऊन बघा.


१) अंदमान व निकोबार द्वीपसमुह

समुद्री जीवन,चौफेर हिरवेगार प्रवाळ आणि घरापासून दूर असे अंदमान-निकोबार हनिमून रोमांचकारी करण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. एकांत बेटावर प्रेमाचा उत्साह वेगळाच असतो. उत्साही पर्यटक कपल जानेवारी ते मे  महिन्यामध्ये या ठिकाणी येतात. या कालावधित येथे गरम आणि उष्णकटिबंधीय पाण्याचा वेगळा आनंद घेता येतो. जर तुम्ही अशा शौकिनामध्ये  असाल तर एक लाइव्ह ड्राइव्ह चा  अनुभव नक्की घ्या. समुद्री जहाजा बरोबर लाटांच्या कोमल आवाजचा अनुभवू घ्या. त्याच बरोबर या निळ्याशार समुद्रात पोहण्याचा आनंद घ्या आणि तुमच्या हनिमूनला एक अविस्मरणीय  बनवा.

२) केरळमध्ये बॅकवॉटर्स चा अनुभव

केरळचा बॅकवॉटर  ला गेलात तर तुम्हाला एक खूप मस्त वातावरण  अनुभवायला मिळेल. कोची पासून चित्तूर, कोट्टायम  बोट फेरी हे याठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. जिथे तुम्हाला तुमच्या हनिमूनचे अनेक क्षण  कॅमेरा मध्ये टिपू शकता. तुम्ही एका वेगळ्या शैली मध्ये तयार झालेले पूल त्याचबरोबर  क्रूजचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.बॅकवाटर मध्ये हाऊस बोट मधील वास्तव्य अविस्मरणीय ठरते.

३) लडाखमध्ये कॅम्प

तुम्हाला जर हिमालयाची सुंदरता  जवळून बघायची असेल तर तुम्ही लक्झरी टेंट मध्ये  राहू शकता. या टेंट मधून  तुम्हाला बर्फाने झाकलेले दरी  डोंगर  पाहायला मिळतील. या बर्फाछित भागात तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या उंट सवारी वरुण  फेरी मारू शकता. शिवाय पोलो खेळ खेळू शकता , रॉयल पॅलेस जाऊ शकता. सिंधू नदीच्या ठिकाणी  सूर्यास्त वेळी सुंदर दिसणारा क्षण तुम्हाला फोटो मध्ये टिपता येईल.


४) राजस्थान गुजरात मध्ये वन्य जीव सफारी

ब्लॅकबक लॉज गुजरात मध्ये वेलवदर नॅशनल पार्क जवळ आहे. जिथे तुम्हाला सर्व सुख सुविधा मिळतील ज्या तुम्हाला हव्यास्या वाटतात.  या ठिकाणी प्लंज पूल झोपडी मध्ये राहू शकता.  ब्लॅक सफारी सोबत तुम्ही भटकंतीला  जाऊ शकता. रात्री चांदण्यांच्या शीतल प्रकाशात जेवणाचा आनंद घेऊ शकता. रणथंबोर नॅशनल पार्क जवळ सुजाण लायन गार्डन मधिल प्राणी तुम्हाला पहावयास मिळतील.

५) टुलीप सीजनमध्ये काश्मीरची सैर

वसंत ऋतूच्या अगदी सुरुवातीला आज काश्मीर मध्ये सगळीकडे हिरवागार गालीचा असतो.   नजर जाते त्या ठिकाणाप्रयंत सर्व भाग निसर्गसंपन्न दिसतो. वर्षभर  काश्मिर एक वेगळा आनंद देऊन जातो त्यातल्या त्यात ट्यूलिप फुलांचा बहार येतो त्या हंगामात विलोभनीय दृश्य पहावयास मिळते. हा सुंदर नजारा तुम्ही एप्रिल महिन्यापूर्वी पाहू शकता. डोंगररांग आणि डललेक याचा एक वेगळा संगम पहावयास मिळते.श्रीनगरमध्ये सध्या बदामांच्या बरीच फुले आहेत.  विशेषत: सोनमर्ग, पहलगाम आणि गुरेझघाटी याठिकाणी तुम्ही वास्तव्य करू शकता आणि हनिमून सर्वोत्तम बनवू शकता.

६)दार्जिलिंग चहा संपत्ती

दार्जिलिंग ही देशातील चहा उत्पादित करणार्‍यां ठिकाणा पैकी प्रमुख ठिकाण आहे.  निसर्गाचा अदभूत नजारा आणि चहाच्या बागा आणि  इथले  रिसॉर्ट सुट्टीसाठी विशेष आकर्षण आहे.याचा अनुभव घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चहाच्या इस्टेटवर मुक्काम करणे. ग्लेनबर्न टी इस्टेट हा डोंगरांतील भाग आपणास स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. वसाहती शैलीतील निवासचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. चहाच्या अनेक जाती तुम्हाला याठिकाणी पहावयास मिळतील.  

७) ताज फालकनुमा पॅलेस, हैदराबाद

जर तुम्ही एका वेगळ्या रोमांचक ठिकाणच्या  शोधात असाल तर तुम्ही ताज फालकनुमा पॅलेस बुक करू शकता आणि या ठिकाणी असलेल्या भव्यतेचा अनुभव घेऊ शकता. एकेकाळी हैदराबादच्या निजामाचे असलेले हे निवासस्थान आता एका मोठ्या हॉटेलमध्ये परिवर्तित झाले आहे. आलिशान स्वरूपात असलेले हॉटेल 32 एकरामध्ये विस्तारलेले आहे. तुम्ही एका लक्झरी निवासाचा अनुभव या ठिकाणी घेऊ  शकता. राजे शाही थाट  तुम्हाला या ठिकाणी पहावयास मिळेल. या महालाच्या खाली असलेल्या घोडागाडी मध्ये तुम्ही सवार व्हा  आणि भटकंती सुरू करा. या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशा आहेत. आपल्या जीवनसाथी बरोबर या ठिकाणचे पर्यटन तुम्हाला अविस्मरणीय राहिल.

८) हंपीची सफर

ऐतिहासिक  जे अविस्मरणीय ठिकाण आहेत त्यामध्ये हम्पी या क्षेत्राचा समावेश होतो. आपल्या पुरातत्व वास्तुकलेचे  उत्कृष्ट नमुने  या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतील.  तुम्हाला जर ऑफबीट प्लॅनिंग हवी असेल तर हे ठिकाण नक्की निवडा आणि आपली भटकंती अविस्मरणीय बनवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com