कुटुंबासह जंगल सफारीला जाताय? जरा थांबा. आधी या महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

अथर्व महांकाळ 
Friday, 11 December 2020

वनविभागाच्या वतीनं पर्यटकांसाठी विचिध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. पण जंगल सफारीला गेल्यावर निसर्गाला आणि वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा स्वतःला इजा होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी पर्यटकांची असते.

नागपूर: हिवाळा म्हंटल की प्रत्येकाला वेद लागतात ते म्हणजे सहलीचे, दूर कुठेतरी कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचे. त्यात जंगल सफारी म्हणजे पर्वणीच. त्यामुळे अनेक पर्यटक विदर्भात जंगल सफारीसाठी येत असतात. विदर्भ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त अभयारण्यं असलेला प्रदेश. विदर्भात एक नाही दोन नाही तर तब्बल ८ वनपर्यटनस्थळ आहेत. इथे अनेक प्रकारचे प्राणी, पशुपक्षी इथे मुक्तपदे संचार करत असतात. या प्राण्यांची आणि पशुपक्ष्यांची जीवनशैली जवळून बघण्यासाठी आणि त्याचं निरीक्षण करण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक कुटूंबासह या अभयारण्यांमध्ये जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. 

वनविभागाच्या वतीनं पर्यटकांसाठी विचिध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. पण जंगल सफारीला गेल्यावर निसर्गाला आणि वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा स्वतःला इजा होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी पर्यटकांची असते. अनेकांना वनविभागानं सांगितलेल्या नियमांची आठवण  राहत नाही. आता चिंता करू नका. जंगल सफारीला गेल्यावर तुमचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.     

क्लिक करा - ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून

या गोष्टी ठेवा लक्षात - 

जंगल सफारीला येताना नवनवीन प्राण्यांचे आणि वन्यसृष्टीचे फोटो काढण्यासाठी स्वतःजवळ कॅमेरा ठेवायला विसरू नका.

जंगल सफारीला जाताना पूर्ण बाह्यांचे आणि जाड कपडे परिधान करा, ज्यामुळे तुमचं थंडीपासून आणि कीटकांपासून संरक्षण होईल. तसंच अतिशय भडक रंगाचे कपडे वापरू नका. यामुळे वन्यप्राणी विचलित होण्याची शक्यता असते. 

तुम्हाला निरनिराळे प्राणी बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर जंगलात असताना कुठलाही मोठा आवाज करू नका किंवा मोठ्यानं ओरडू नका. यामुळे वन्यप्राणी तुमच्या दूर जाऊ शकतात. 

जंगल सफारी करताना जंगलात कुठेही एकटे जाऊ नका. नेहमी आपल्या ग्रुपसोबत किंवा गाईडसोबत राहा. 

स्वतःबरोबर अनावश्यक सामान आणू नका. चष्मे, स्वेटर, बूट, पाण्याची बाटली, रुमाल, रेनकोट, टॉर्च आणि प्रथमोपचार पेटी या आवश्यक गोष्टी स्वतःच्याजवळ बाळगा.

अधिक वाचा - २४ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर सापडलेल्या 'वर्षा'चं गृहमंत्री अनिल देशमुख करणार कन्यादान 

जंगलातील कुठल्याही प्राण्याला स्वतःजवळ असलेले पदार्थ खाण्यासाठी देऊ नका. यामुळे त्यांच्या राहणीमानावर परिणाम होऊ शकतो. 

जंगलात भरमां करत असताना मोबाईल वापरू नका, तसंच जंगलात धूम्रपान करू नका. यातील एका ठिणगीमुळे संपूर्ण जंगलात आग लागण्याची शक्यता असते. 

हिंस्त्र पप्राण्यांपासून नेहमी दूर राहा. ते पाळीव नाहीत याचं भान असू द्या. तुमच्यावर ते हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका.   

एकूणच काय तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या प्रियजनांसोबत जंगल सफारीचा आनंद घ्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dos and do not for going jungle safari with family