हिमालयीन ट्रेकपूर्वी नक्की करा हे चार व्यायाम; एका महिन्यात होईल ट्रेकची तयारी

हर्षदा कोतवाल
Wednesday, 26 February 2020

हिमालयातील सोपे ट्रेक्स करण्यासाठीही किमान एक महिना आधीपासून व्यायामाला सुरुवात करावी. आठवड्यातून चार दिवस हे व्यायाम केल्याने ट्रेकचा आनंद अधिक घेता येतो. 

हिमालयातील सोपे ट्रेक्स करण्यासाठीही किमान एक महिना आधीपासून व्यायामाला सुरुवात करावी. आठवड्यातून चार दिवस हे व्यायाम केल्याने ट्रेकचा आनंद अधिक घेता येतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

चालणे 
चालण्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो; तसेच तुमच्या पायांना वजन सहन करण्याची सवय लागते. चालण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि सर्व अवयवांना अधिक ऑक्सिजन मिळतो. 

धावणे 
 कोणत्याही ट्रेकला जाण्यापूर्वी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. धावण्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊन शरीरातील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हिमालयात सर्वांत जास्त ताण तुमच्या फुफ्फुसांवर येतो आणि धावण्यामुळे फुफ्फुसांचा व्यायाम होतो. 

स्क्वॉट्स 
कंबरेच्या खालच्या भागाला आणखी बळकट करायचे असल्यास हा व्यायाम नक्की करावा. यामुळे पाय, मांड्या यांच्यातील ताकद वाढते आणि ट्रेक करताना बॅलन्स मिळवता येतो.

मला फॉलो करा आणि शंका विचारा
इन्स्टाग्राम हॅंडल : @harshadakotwal5 

पायऱ्या चढणे 
पायऱ्या चढणे हे कोणत्याही ट्रेकसाठी अत्यंत उपयोगी ठरते. पाठीवर बॅग घेऊन पायऱ्या चढल्याने खांद्याची ताकद वाढते व तुम्हाला डोंगरात चढाई करण्याचीही सवय होते. 

पहिला आठवडा
-चालणे आणि धावणे- 2 ते 3 किमी (40 मिनिटांमध्ये)

दुसरा आठवडा
-चालणे आणि धावणे-  3 किमी (30 मिनिटांमध्ये)
- स्क्वॉट्स- 15*3

तिसरा आठवडा
-चालणे आणि धावणे-  3 किमी (30 मिनिटांमध्ये)
- स्क्वॉट्स- 20*3
- पायऱ्या चढणे- 10 पायऱ्या (10वेळा)

चौथा आठवडा
-चालणे आणि धावणे-  3 किमी (30 मिनिटांमध्ये)
- स्क्वॉट्स- 20*3
- पायऱ्या चढणे- 10 पायऱ्या (पाठीवर चाल किलोची बॅग घेऊन 10वेळा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harshada kotwal article Exercise before trek in the Himalayas