पर्यटन व्यवसायात नोकऱ्यांचा ‘बहर’!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन व्यवसायात नोकऱ्यांचा ‘बहर’! 

जपानी लोक स्वतःही खूप पर्यटन करतात. जपानमध्ये २१ वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत. टोकियो, क्योतो, नारा, हिरोशिमा, कोबे, होक्काइदो, ओकिनावा अशी अनेक शहरे वेगवेगळ्या ऋतूमध्ये पर्यटकांना आकर्षित करतात. 

पर्यटन व्यवसायात नोकऱ्यांचा ‘बहर’! 

अतिथी देवो भव: हे जपानमध्ये पदोपदी अनुभवयाला मिळते. जपानमध्ये पर्यटन व्यवसाय हा खूप मोठा असून, २०१८मध्ये ३ कोटी ११ लाख ९० हजार परदेशी पर्यटक येऊन गेले. जपानी लोक स्वतःही खूप पर्यटन करतात. जपानमध्ये २१ वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत. टोकियो, क्योतो, नारा, हिरोशिमा, कोबे, होक्काइदो, ओकिनावा अशी अनेक शहरे वेगवेगळ्या ऋतूमध्ये पर्यटकांना आकर्षित करतात. 

जपानमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे आणि तरुणांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जपानमध्ये पर्यटन व्यवसाय, हॉटेलचे व्यवस्थापन, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांची खूप गरज भासत आहे. हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम अशा प्रकारचे शिक्षण घेत आहेत, त्यांनी जपानी भाषेचा अभ्यास अगदी पहिल्या वर्षांपासून केल्यास त्यांना जपानमध्ये आणि जपानबरोबर काम करणाऱ्या भारतीय पर्यटन व्यवसायामध्ये व हॉटेल व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. पगारही खूप जास्त मिळू शकतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण या व्यवसायात असणाऱ्या सगळ्या संधींबद्दल माहिती करून घेऊया 

१) पर्यटन व्यवसाय - 
जपानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे त्याला लागणाऱ्या बऱ्याच सेवाही मोठ्या प्रमाणात लागतात. जपानमध्ये हिवाळा, पावसाळा, वसंत आणि उन्हाळा असे चार ऋतू असून, चारही ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पर्यटन व्यवसाय चालतो. पर्यटनासाठी लागणारे बुकिंग एजंट, टूर प्लॅनर्स, व्यवस्थापन करणारे मॅनेजर्स गाइड वगैरे सगळ्याच प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. 

२) हॉटेल व्यवसाय - 
हॉटेल व्यवसायात, हॉटेल मॅनेजर्स, हॉटेल बुकिंग एजंट्स, हाऊस कीपिंग, रिसेप्शनिस्ट अशा सगळ्याच प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. 

३) उपाहारगृह व्यवसाय - यामध्ये मॅनेजर्स, वेगवेगळ्या प्रकारचे कूक्स, वेटर्स, रिसेप्शनिस्ट अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. जपानमध्ये हजारो भारतीय उपाहारगृहे आहेत. त्यामध्येही खूप संधी आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या नोकऱ्या थेट जपानमध्ये मिळू शकतात, त्याचबरोबर जपानी लोक जगभर फिरत असतात त्यामुळे जपानी भाषेवर प्रभुत्व असल्यास कोठल्याही देशामध्ये वरील क्षेत्रांत नोकरी मिळू शकते आणि भाषा येत असल्यामुळे पगारही जास्त मिळतो. 

अनेक जपानी विद्यार्थी भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करत असतात आणि ते भारतात अभ्यासासाठी येत असतात. तसेच, अनेक भारतीय विद्यार्थी जपानला शिकण्यासाठी जातात. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते. उदाहरणार्थ - शैक्षणिक टूरचे व्यवस्थापन, वेगवेगळ्या शैक्षणिक ठिकाणांच्या भेटी आणि त्यांची माहिती वगैरे. या प्रकारच्या कामातही ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. भारतामध्ये जपानी उपाहारगृहे आहेतच पण त्याच बरोबर सगळ्याच पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्समध्ये जपानी पदार्थ मिळतात. जपानी पर्यटक तिथे आवर्जून जातात. पर्यटकांशिवाय व्यवसाय करणारे जपानी लोकही सगळीकडे फिरत असतात आणि अशा उपाहारगृहांना भेट देत असतात. त्यामुळे अशा हॉटेल्समध्ये जपानी भाषा येणारे हॉटेल मॅनॅजमेन्ट केलेले उमेदवार व्यवस्थापनासाठी लागतातच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझमचेच काम करताना फक्त भाषा शिकून जास्त पगार मिळणार असेल, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जपानी शिकण्याचा विचार नक्की करावा. जपानी भाषेचे व्याकरण मराठीसारखे असल्यामुळे ती शिकायला सोपी जाते आणि जपानी संस्कृती खूप जुनी असल्यामुळे शिकण्यासाठी खूप काही मिळते. प्रवाहाबरोबर सगळेच शिकतात परंतु काहीतरी जास्त शिकल्याचा आयुष्यभर फायदा नक्की होतो. 

सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया 

टॅग्स :IndiaTravel