हैदराबाद फिरायला जाताय? मग जवळपासच्या या ठिकाणांना भेट द्यायला विसरु नका

टीम ईसकाळ
Friday, 19 February 2021

हैदराबाद शहराला समृध्द इतिहासासोबतच प्राकृतिक सौंदर्य देखील लाभल्याने जगभरात हैदराबाद शहराची वेगळी ओळख तयार झाली आहे. या शहरात एकट्याने किंवा कुटुंबासोबत फिरण्याची मजाच वेगळी आहे. इतकेच नाही तर शहराच्या जवळ असंख्य स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही फिरु शकता. आज आपण हैदराबादच्या ट्रिपमध्ये हमखास पाहावेत अशा काही पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहेत.

हैदराबाद या शहराला नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते,  हैदराबाद  शहराचा इतिहास लक्षात घेता त्याचं कारण आपल्या लक्षात येतं. या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहराचा नवाबी थाट हैदराबादच्या खानपान ते येथील पर्यटनस्थळांना भेट दिली  तरी लक्षात येतो. या शहराला समृध्द इतिहासासोबतच प्राकृतिक सौंदर्य देखील लाभल्याने जगभरात हैदराबाद शहराची वेगळी ओळख तयार झाली आहे. सुंदर टेकड्या  आणि त्यामध्ये वाहणारे निखळ झरे त्यासोबत सुंदर तलावांनी नटलेल्या या शहरात एकट्याने किंवा कुटुंबासोबत फिरण्याची मजाच वेगळी आहे. 

फक्त हैदराबादच नाही तर त्या शहराच्या जवळपास देखील असंख्य स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही फिरु शकता. आज आपण हैदराबादच्या  ट्रिपमध्ये हमखास पाहावेत अशा काही पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहेत.

चिलुकुर बालाजी मंदिर
उस्मानसागरच्या तटावर वसलेल्या छोट्याशा गावात तब्बल पाचशे वर्ष जूने चिलुकुर बालाजी मंदिर आहे, हे ठिकाण हैदराबादच्या जवळच असलेलं सर्वात प्रेक्षणीय ठिकाण आहे. अशी मान्यता आहे की येथे बालीजी भक्तांची प्रत्येक मनोकामना पुर्ण होते आणि जे कोणी तिरुपतीला जाऊन दर्शन घेऊ शकणार नाहीत त्या सगळ्यांच्या इच्छा या ठिकाणी पुर्ण होतात. हे मंदिर हैदराबादपासून फक्त २८ किमी दूर आहे. 

उस्मान सागर तलाव
हैदराबादसून फक्त २२ किमी अंतरावर असलेल्या हा तलाव ४६ स्क्वेअर किमी जागेवर पसरलेला आहे. या तलावाचे नाव उस्मान सागर हे हैदराबादचे निजाम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हैदराबादच्या जवळ असलेल्या सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी ही एक जागा आहे. फॅमिली पिकनीकसाठी ही जागा परफेक्ट डेस्टिनेशन आहेच, त्यासोबतच येथे सुर्यास्त पाहण्याचा वेगळाच आनंद आहे. 

सांघी मंदिर
तेलंगानाच्या सर्वात लोकप्रीय तीर्थस्थळांपैकी एक असणारे हे मंदीर देखील हैदराबादपासून ३० किमी अंतरावर आहे. सांघी मंदीर पंधरा फूट लांबीचे असून चोल चालुक्य स्थापत्य शैलीत बांधण्यात आलेले आहे. सांघी मंदिर परिसरात असलेल्या इतर वेगवेगळ्या मंदिरांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. 

रामोजी फिल्म सिटी
हैदराबाद शहरापासून तब्बल ४१ किमी अंतरावर वसलेली रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्र आहे. भारतात सर्वात मोठी असलेली हि फिल्म सिटी तब्बल २५०० एकर क्षेत्रात पसरलेली आहे. चित्रपट निर्माता रामोजी राव हे रामोजी फिल्म सिटीचे मालक आहेत. अनेक प्रसिध्द चित्रपटांचे शुटिंग या फिल्मसिटीत झाले आहे.  येथे प्रवेशासाटी तुम्हाला ९००-१००० रुपये प्रवेश फी द्यावी लागेल. 

भोंगीर किल्ला
हैदराबादपासून तब्बल ५० किमी अंतरावर असलेला हा किल्ला ऐतिहासिक ठेवा आहे. हा किल्ला चालुक्य प्रशासकांनी बांधला होता अगदी. अनोख्या अंड्याच्या आकाराचा हा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगलाच प्रसिध्द आहे. हैदराबादच्या जवळपास सर्वाधीक पाहिल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know about beautiful tourist places to must visit near Hyderabad Marathi article