भारतात ज्युरासिक पार्कचा अनुभव घ्यायचाय? मग या म्यूझियमला नक्की भेट द्या

know about Indias first dinosaur museum and park in Gujrat Marathi article
know about Indias first dinosaur museum and park in Gujrat Marathi article

आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना कायम पाश्चिमात्य देशांमध्ये फिरायला जाण्याची हौस असते. युरोप, अमेरिकेत फिरायला जाण्याची स्वप्न बरेच जण पाहातात. या पाश्चिमात्य देशातील इमारती, म्युझियम, चर्च अशा गोष्टी खूप प्रसिद्द  आहेत. लोक त्या पाहाण्यासाठी या देशांना भेटी देतात. पण आपल्या देशात असलेली परदेशाच्या तोडीची अनेक ठिकणे बऱ्याच लोकांना माहिती देखील नसतात. आज आपण अशाच बऱ्याच जणांना माहिती नसलेल्या एका भन्नाट ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत. 

तुम्हाला माहिती आहे का की, गुजरातमध्येही असे एक पार्क आहे ज्या पार्कला  ज्युरासिक पार्क असे म्हणतात. तुम्ही कदाचित याबद्दल ऐकले देखील असेल किंवा वर्तमानपत्रात वाचले असेल. बर्‍याचदा टीव्हीवर किंवा चित्रपटांमध्ये आपण डायनासोर पाहतो  आणि आश्चर्यचकित होतो की असे डायनासोर खरोखरच पृथ्वीवर होते का? पण, गुजरातचे डायनासोर जीवाश्म पार्क पाहून तुम्हाला खात्री होईल की कधीतरी पृथ्वीवर हे अवाढव्य डायनासोर होते. एवढेच नाही तर या पार्कमध्ये फिरतान तुम्हाला ज्युरासिक पार्कमद्ये घेल्याचा अनुभव येईल. चला तर मग जाणून घेऊयात या अनोख्या पार्क विषयी.

बालासिनोर डायनासोर फॉसिल पार्क

बालासिनोर डायनासोर फॉसिल पार्क किंवा संग्रहालय गुजरातच्या बालासिनोर शहरातील रायोली या गावात आहे. बालासिनोर डायनासोर जीवाश्म पार्क हे जगातील तिसरे आणि भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय आहे. बालासिनोर शहर पूर्वी वॅलासिनोर म्हणून ओळखले जात असे. असे म्हटले जाते की येथे डायनासोरची हजारो अंडी सापडली आणि त्यानंतर हे संग्रहालय बांधले गेले. 

उद्यानाचा इतिहास

असे म्हटले जाते की डायनासोरची अंडी आणि जीवाश्म 1980-81 च्या सुमारास रियोलीमध्ये सापडली, ही अंडी लाखो वर्षांपुर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोरची आहेत हे संशोधनानंतर पुढे आले. हा पार्क 52२ हेक्टरवर पसरलेले आहे. तसेच हे उद्यान आता संग्रहालयात रूपांतरित केले गेले आहे ज्या ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकतो.

येथे विशेष काय आहे?

या उद्यानात आपल्याला डायनासोरच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीची संपूर्ण माहिती मिळेल. येथे आपणास डायनासोर जीवाश्मांचे बारकाईने पाहता येतील आणि त्यांच्याबद्दल अधीक माहिती तुम्हाला या ठिकाणी देखील मिळेल. या उद्यानात विविध प्रजातींचे डायनासोर तुम्ही पाहू शकता. तसेच सखोल माहिती घेण्यासाठी गाईडदेखील सोबत घेऊ शकता.

 कसे पोहचाल?

या उद्यानाला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम गुजरातच्या अहमदाबाद शहरात जावे लागेल. अहमदाबादहून या उद्यानात जाण्यासाठी आपण स्थानिक बस किंवा खासगी वाहनाने जाऊ शकता. उद्यानास भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा मानला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com