
शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतो. म्हणून या गावातील दरवाजे नसतानाही घरात चोरीसारख्या घटना घडत नाहीत.
जळगाव ः घरातील सर्वांना जेव्हा बाहेर जायचे असते तेव्हा घराचा दरवाजा बंद करून कडी लावून कुलूप लावून बाहेर जातात. पण असे गाव आहे की जीथे घराला मुख्य दरवाजाच नाही आणि आणि दरवाजा नसतांना या गावात एक ही चोरी घटना होत नाही. तर चला मग जाणून घेवू असे कोणते गाव आहेत...
महाराष्ट्रात असे गाव आहे ते शनि शिग्नापुर. गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतो. म्हणून या गावातील दरवाजे नसतानाही घरात चोरीसारख्या घटना घडत नाहीत.
अशी आहे कथा...
अनेक वर्षांपूर्वी पाऊस आणि पुर या गावात आला होता. यात एक खडकाचा दगड गावातून वाहून आला होता. ग्रामस्थांनी या दगडाला स्पर्श केला असता दगडातून रक्तस्त्राव होऊ लागला. आणि त्या रात्री शनिदेव गावप्रमुखांच्या स्वप्नात आले आणि सांगितले की हा दगड त्यांची स्वतःची मूर्ती आहे. शनिदेवने आज्ञा दिली की हा दगड गावातच ठेवावा. त्यानंतर शनि देवांने सर्वांना आशीर्वाद देऊन गाव धोक्यापासून वाचवण्याचे आश्वासन दिले.
लोह दगड संरक्षण करते.
शनि देव करतात संरक्षण..
शनि देवाचा मंदिराला ना लोखंडी ग्रील ना दरवाजा ना बांधकाम आहे. तसेच गावातील प्रत्येक घराला देखील दरवाजा नसून शनिदेव गावाची संरक्षण करतो असा लोकांचा असा विश्वास आहे. की जो कोणी गावात चोरी करण्याचा प्रयत्न करतो त्याला साडेसात वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनि देव देतात. आणि जर कोणी त्यांच्या घराचे दरवाजे लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते घराच्या लोकांसाठी वाईट आहे.