esakal | निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं 'उत्तराखंड' ऐतिहासिकदृष्ट्याही फेमस; जाणून घ्या 'देवभूमी'चे खास रहस्य
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

उत्तराखंड खास करुन आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. परंतु, इथली बरीच अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, जी प्रत्येकाला भुरळ घालत आहेत.

निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं 'उत्तराखंड' ऐतिहासिकदृष्ट्याही फेमस; जाणून घ्या 'देवभूमी'चे खास रहस्य

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे आणि म्हणूनच, येथे जगातील विविध भागातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. याशिवाय इथला सांस्कृतिक वारसा देखील खूपच रंजक आहे. या राज्यात बर्‍याच ठिकाणी अशी जागा होती, जी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची मानली जात होती. चला तर मग, जाणून घेऊयात या राज्यातील रंजक तथ्ये..

उत्तराखंडला देवतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. उत्तराखंडमध्ये भारतातील अनेक नामांकित हिंदू आणि शीख मंदिरे आहेत. परंतु, असे दिसून आले आहे की, राज्याच्या इतिहासाबद्दल अनेकांना याची फारसी माहिती नाही. आपल्यापैकी कित्येकांना ठाऊकही नाही, की चंद आणि कत्युरी हे राज्यातील दोन प्रमुख राजवंश होते. ज्यांनी उत्तराखंडच्या इतिहासामध्ये मोठा हातभार लावला आहे. या व्यतिरिक्त, उत्तराखंडमध्ये कौरवांची पूजा केली जाते आणि येथे बहुपत्नीची देखील मोठी परंपरा आहे. तर, आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अशाच काही ऐतिहासिक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या उत्तराखंड ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये नक्कीच समावेश कराल..

भारतातील जुनी समाधीस्‍थळे; जी पर्यटकांना करतात आकर्षित

कटारमल सूर्य मंदिर

उत्तराखंडमधील कटारमल गावात 'कटारमल सूर्य मंदिर' आहे, जे समुद्रसपाटीपासून 2,116 मीटर उंचीवर आहे. हे सूर्यदेवला समर्पित केलेले भारतातील दुसरे सर्वात सुंदर मंदिर आहे. 9 व्या शतकात या प्रदेशावर राज्य करणाऱ्या कत्युरी शासक, कटारमल्ला यांनी हे मंदिर बांधले होते. मुख्य मंदिराखेरीज येथे आणखी 45 मंदिरे आहेत. यात भगवान शिव, त्यांची पत्नी देवी पार्वती, लक्ष्मण आणि नारायण यांचा समावेश आहे.

द्वारहाट

कुमाऊं पर्वतांमध्ये 2000 मीटर उंचीवर वसलेले द्वारहाट, उत्तराखंडमधील ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. द्वारहाटमध्ये जवळपास 55 मंदिरे आहेत, ती मध्ययुगीन काळात कत्युरी राजांनी बांधली होती. मंदिरांव्यतिरिक्त द्वारहाट असे स्थान आहे, जेथे तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल.

वेस्टर्न यूपी पर्यटन क्षेत्रासाठी आहे समृद्ध; मंदोदरी मंदिर, सूरजकुंड पार्क

चौखुटिया, अल्मोडा जिल्हा

रंगिलो ग्वार म्हणून प्रसिद्ध असलेले चौखुटिया उत्तराखंडच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार आहे. हे शहर कत्युरी राजवंशाचे किल्ले आणि मंदिरांच्या रूपात आजही जपले आहे. पौराणिक कथेनुसार, महाभारतातील पांडव वनवासात असताना येथेच राहिले असल्याचे इतिहासात दाखले आढळतात. चौखुटिया येथील पांडुखोली लेण्या पांडवांनी बांधल्या आहेत. उत्तराखंडला भेट देताना तुम्ही एकदा चौखुटियाला जरुर भेट द्या..

वनसूर किल्ला

वनसूरचा किल्ला म्हणून ओळख असणाऱ्या किल्ल्याला बाणासुरचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. वनसूर किल्ला लोहाघाटपासून 7 किमी आणि चंपावतपासून 20 किमी अंतरावर आहे. असे मानले जाते, की ही जागा भगवान श्रीकृष्णाकडून पराभूत झालेल्या वनसूर राक्षसाची राजधानी होती. सध्या आपण येथे केवळ किल्ल्याचे अवशेष पाहू शकता. ऐतिहासिक दृष्टीकोनातून हे स्थान फार महत्वाचे मानले जाते.

बागेश्वर

बागेश्वर हे असे ठिकाण आहे, जिथे शरयू, गोमती आणि भागिरथी अशा तीन नद्यांचा एकत्र संगम होतो. बागेश्वर येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जिथे देशभरातून भाविक आणि पर्यटक येतात. येथे आपण बागनाथ मंदिर, बामणी मंदिर, चंडिका मंदिर, श्रीहरू मंदिर आणि गौरी उदियर अशा बर्‍याच मंदिरांमध्ये फिरू शकता. मंदिरांना भेट देण्याशिवाय तुम्ही बागेश्वरमध्येही ट्रेकिंग करू शकता. पिंडारी ग्लेशियर किंवा पांडुथल येथे तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता.

कानपूर फिरण्याचा खरा आनंद घ्‍यायचाय तर या १० ठिकाणी नक्की भेट द्या

घुड्डुडा, अल्मोडा जिल्हा

उत्तराखंडमधील इतर ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच अल्मोडा जिल्ह्यातील घुड्डुडा येथे कोणतेही विशिष्ट असे स्मारक नाही. परंतु, तरीही शहराला वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. असे मानले जाते, की ब्रिटिशांच्या काळात घोड्यांच्या शर्यतीमुळे या शहराचे नाव 'घुड्डुडा' ठेवले असावे, असे अंदाज व्यक्त केला जातो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एका विशाल मैदानावर ही शर्यत मोठ्या थाटामाटात पार पडली जात होती. असेही म्हटले जाते, की ही शर्यत स्वत: च्या मार्गाने निवडली जायची आणि जो कोणी ही शर्यत जिंकेल, त्याला त्याच्या आवडीचे बक्षीस निवडण्याचा पर्याय होता. खेळामध्ये रस असणार्‍या लोकांसाठी अल्मोडा जिल्ह्यातील हे छोटे शहर एक उत्तम उदाहरण आहे.

loading image
go to top