मराठमोळ्या शिलेदारांकडून वजीर सुळका सर...!!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला 250 फूट उंच असलेला  वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 250 फुटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला 250 फूट उंच असलेला  वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 250 फुटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. 

महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर शिलेदार ऍडव्हेंचर इंडियाच्या धडाकेबाज गिर्यारोहकांनी पाच जानेवारीला केले. शिलेदार संस्थेचे संस्थापक सागर विजय नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुळका सर करून गिर्यारोहण क्षेत्रात एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे.  या मोहिमेत शिलेदार संस्थेचे लीड क्लायम्बर विशाल मोरे यांनी मोहिमेची धुरा सांभाळली तर त्यांना दिपक विसे, शुभम महाडिक यांनी मोलाची साथ दिली आणि वजीर सुळक्यावर प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकावला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by विशाल मोरे (@bhatkya_sahyadricha) on

यानंतर त्यांच्यापाठोपाठ शिलेदार संस्थेचे राकेश यादव, अक्षय इंदोरे, अनिकेत जाधव, सागर नलवडे सह्यगिरी संस्थेचे दिपक, कुसुम यांनीही वजीर सुळका सर केला. या मोहिमेत शिलेदार संस्थेचे मार्गदर्शक सुंदरदादा चाळके, स्वनिल कदम, आदित्य नाखवा, अक्षय शेलार यांनी बेस कॅम्प वर महत्वाची जबाबदारी पार पाडली. 

 नववर्षातील फक्त पाच दिवसात तीन सुळके सर

2020च्या सुरवातीलाच धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या पाच दिवसांत तीन सुळके सर केले आहेत. एक जानेवारीला 2969  फूट उंचीचा लिंगाणा सुळका पुणे येथील अवघ्या चार वर्षे वय असलेल्या सह्याद्री महेश भुजबळ या चिमुकलीसह सर केला. तीन तारखेला ढाक बहिरी येथील 200 फूट उंचीचा कळकराय सुळका सर केला तर पाच तारखेला शहापूर ठाणे येथील 250 फूट उंचीचा वजीर सुळका सर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiledar Adventure India successfully climbed Vajir Pinnacle