या देशांमध्ये आहेत विचित्र कायदे, येथे पत्नीचा वाढदिवस विसरणे आहे गुन्हा 

these countries have weird law in Marathi article
these countries have weird law in Marathi article
Updated on

भारतीय पुरुषांना बायकोचा वाढदिवस असो की लग्नाची एनीव्हर्सरी दोन्ही तारखा लक्षात ठेवण काही शक्य होत नाही. समजा तारीख लक्षात देखील राहीली तरी ते फक्त शुभेच्छा देऊन वेळ मारुन नेताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात असाही एक  देश आहे ज्या ठिकाणी बायकोचा वाढदिवस विसरलात तर तुम्हाल थेट तुरुगांची हवा खावी लागू शकते.  अगदी खरं आहे हे, समोआ या देशात राहणाऱ्या जोडप्यांसाठी हा कायदा लागू होतो, ज्यानुसार दोघांनाही आपल्या जोडीदारास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि तो सेलिब्रेट करणे बंधनकारक आहे. खासकरुन पुरुषांसाठी हा कायदा आणखीणच कडक स्वरुपात लागू करण्यात येतो. असा विचित्र कायदा असलेला जगातील हा एकमेव देश आहे असे नाही. जगात असेव चित्र-विचित्र कायदे असणारे असंख्य देश आहेत. आज आपण असेच काही देश आणि त्यामधील कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. 


येथे पक्ष्यांना खाऊ घलण्यास मनाई आहे 

व्हेनिस हे इटलीमधील एक अतिशय सुंदर शहर आहे आणि या ठिकाणाचे सौंदर्य टिकवण्यासाठी येथे सरकारने पक्ष्यांना चारा टाकण्यावर बंदी घातली आहे. जर एखादी व्यक्ती येथे धान्य पक्षांना टाकताना दिसत असेल तर त्याला तगडा दंड भरावा लागतो. या देशाच्या सरकारने हे केले आहे कारण पक्ष्यांना खायला दिल्यावर ते इथल्या सुंदर इमारतींवर घाण करतात आणि रोगांचे प्रमाणही वाढवतात. म्हणून जर आपण व्हेनिसला गेलात तर पक्ष्यांना खायला देताना आपला वेळ वाया घालवू नका, तर या सुंदर देशाला भेट द्या आणि आनंद घ्या. 

येथे शिट्टी वाजवण्यावर आहे बंदी

कॅनडाच्या ओंटारियो शहरात शिट्टी वाजवणे, किंचाळणे आणि अगदी तोंडातून जोराच श्वास सोडणे हा देखील गुन्हा आहे. कारण असे केल्याने तोंडातून आवाज येतो आणि कॅनडाच्या या शहरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार एखादी व्यक्ती असे करत आढळल्यास शिक्षा म्हणून दंड भरावा लागतो. जर या देशात सहलीचा प्लॅन करत असाल तर जिथे जाल तिथे रुमाल सोबत ठेवा आणि जेव्हा शिंक, खोकला आणि श्वास घेण्याची इच्छा असेल तेव्हा तोंडावर ठेवा. यामुळे आवाज कमी होतो. 

रात्री उशीरा फ्लश करण्यावर बंदी

जर आपण स्वित्झर्लंडला भेट देण्याचा विचार करीत असाल तर नक्कीच हा कायदा एकदा जाणून घ्या. वास्तविक स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 नंतर टॉयलेट वापरल्यानंतर तुम्ही फ्लश करु शकत नाहीत. या कायद्यामागील सरकारचे उद्दीष्ट ध्वनी प्रदूषण दूर करणे हे आहे. साहजिकच टॉयलेटला  जाण्यासाठी काही वेळ ठरलेली नसते मग अशा वेळी रात्री उशीरा स्वच्छतेसाठी फ्लशऐवजी मग वापरा. यामुळे आवाज कमी होईल.  

 इतर धर्मांची पुस्तके वाचण्यावर बंदी

इस्लामी देश मालदीव हे भारतीयांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे, परंतु जर तुम्ही अधिक धार्मिक असाल तर तुम्हाला कदाचित या देशातील कायदा अजिबात आवडणार नाही. येथे इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्माची पुस्तके वाचण्यास बंदी आहे. वास्तविक, या देशाचे सरकार इस्लामच्या विरोधात असलेले कोणत्याही गोष्टी करण्यास परवानगी देत ​​नाही.  येथे पॉर्न चित्रपट पाहणे आणि मद्यपान करण्यासही मनाई आहे. जर आपण हॉटेलमध्ये असाल तर रात्रीच्या वेळी आपण आपल्या खोलीत अल्कोहोल घेऊ शकता.  तसेच धार्मिक पुस्तक वाचायचे असेल तर इंटरनेट वापरा.

महिलांना एका ग्लास पेक्षा जास्त वाइन पिण्यावर बंदी

बोलिव्हियामध्ये महिलांना बार आणि हॉटेलमध्ये फक्त एक ग्लास वाइन पिण्याची परवानगी आहे. यामागील सरकारचे कारण म्हणजे दारू घेतल्यानंतर महिला नियंत्रणातून बाहेर जातात. बर्‍याच वेळा पुरुष त्यांचा गैरफायदा घेतात, असे प्रकार टाळण्यासाठी हा कायदा बनविण्यात आला आहे. तसे, जर आपल्याला एकापेक्षा जास्त ग्लास वाइन घ्यायचे असतील तर आपण ती आपल्या खोलीत घेऊ शकता. 

इथे च्युइंगम खाऊ शकत नाहीत

आपण भारतात बर्‍याच लोकांना पाहिले असेल की च्युइंगम खाल्ल्यावर ते कुठेही थुंकलेले असते. असे होऊ नये यासाठी भारतात कोणताही नियम बनलेला नाही, परंतु तुम्ही सिंगापूरला गेलात तर डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला च्युइंगम मिळणारच नाही. सिंगपुरमध्ये 2004 पासून हा कायदा अस्तित्त्वात आला आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही सिंगापूरला जाता तेव्हा चिंगमऐवजी दुसरे पदार्थ खावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com