visit these places in the country to enjoy the cable car ride Marathi article
visit these places in the country to enjoy the cable car ride Marathi article

केबल कार राइडचा आनंद घेण्यासाठी देशातील या ठिकाणी भेट द्या

Published on

प्रत्येकाला प्रवास करण्याची नव्या ठिकाणी फिरायला जाण्याची आवड असते. लोकाना  फिरण्यासोबतच इतरही अनेक आवडीनिवडी असतात ज्या पुर्ण करण्यासाठी ते जगभरातील वेगवेगळ्या देशांना भेटी देतात. मात्र, सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे परदेशात जाणे तितकेसे सोपे राहिले नाही. त्यामुळे लोक पर्यटनासाठी देशातीलच ठिकाणांना पसंती देत आहेत. तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकदा भारतातील या केबल कार राइड नक्की ट्राय करा.  

गुलमर्ग

गुलमर्गमध्ये आशियातील सर्वात मोठी केबल कार सिस्टम आहे. येथे आपण दोन टप्प्यांत केबल कार राइडिंगचा आनंद घेऊ शकता. पहिल्या टप्प्यात स्काय रिसॉर्टमधून कुंगडोरी व्हॅलीकडे जाता येते. दुसऱ्या टप्प्यात आपण कुंगडोरी येथून अप्परवाथ शिखरावर जाऊ शकता. जर तुम्ही दोन्ही टप्प्यात केबल कार राइडडचा आनंद घेत असतील तर हे अडीच किलोमीटरचा प्रवास होतो. एकदा केबल कारच्या कोचमध्ये गेल्यानंतर केवळ 6 लोक प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

औली, उत्तराखंड

औलीची भारतातील सर्वात मोठी केबल कार राइडिंग सेवा आहे. येथे तुम्ही 4 किलोमीटर पर्यंतच्या केबल कार सफारीचा आनंद घेऊ शकता. औली मधील केबल कार राइड जोशीमठ ते औली दरम्यान आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोच मध्ये बसून उंच हिमालय शिखरे अगदी जवळून पाहू शकता. हा प्रवास 15 मिनिटे चालतो. आपण केबल कारच्या कोचमध्ये बसून सुंदर फोटो देखील क्लिक करू शकता.

गंगटोक, सिक्कीम

सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे आपण केबल कार राइडचा आनंद घेऊ शकता. हा केबल कारचा  प्रवास देवरली बाजार येथून सुरू होते आणि एननामंग मार्गे ताशिलिंग या ठिकाणी संपेल. जर हवामान चांगले राहीले तर या प्रवासाच्या वेळी तुम्हाला कांचनगंगाचे दर्शनदेखील मिळू शकते. 

रायगड, महाराष्ट्र

आपण महाराष्ट्रात रायगड येथे देखील  केबल कार राइडिंगचा आनंद घेऊ शकता.. दरवर्षी हजारो पर्यटक रायगडला भेट देण्यासाठी येतात. येथे ऐतिहासिक वारसा या व्यतिरिक्त आपण केबल कार राइडिंगचा आनंद घेऊ शकता. रायगड किल्ल्याला मोठा ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रात फिरायला जात असाल तर या ठिाणाला नक्की भेट द्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com