

Perfect 31 December Plan in Manori
Esakal
Manori Tourism: लांब प्रवासाचा विचार करून कंटाळा आला आहे का? तर या नवीन वर्षाच्या संध्याकाळी मालाडजवळील मनोरी हा एक उत्तम पर्याय ठरतो. शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी मनोरी शांत, सुरम्य आणि आरामदायक ठिकाण आहे. इथे समुद्रकिनारा, हिरवळ, गावातील पारंपरिक वातावरण आणि घरगुती जेवण यामुळे गर्दीही तुलनेने कमी असते.