esakal | आगीच्या झळा सोसूनही देखणेपण जपणारा पॅलेस | Bangloare
sakal

बोलून बातमी शोधा

TOURISM

आगीच्या झळा सोसूनही देखणेपण जपणारा पॅलेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूरू : दक्षिण भारताच्या पर्यटन विषयक धोरण किंवा तिथल्या पर्यटन स्थळांविषयी बोलायचे म्हणजे शब्द अपुरे पडतील. भारतातील दहा मुख्य पर्यटन राज्यामध्ये कर्नाटक चौथ्या क्रमांकावर असून भारतीय व विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.भारतातील सर्वात जास्त (५०७) प्राचीन संरक्षित स्मारके कर्नाटक राज्यात आहेत.निसर्ग सौंदर्य आणि प्राचीन वारसा यांचा अनोखा संगम कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळतो.सुंदर समुद्रकिनारे,जैवविविधतेने नटलेली अभयारण्ये,प्राचीन इतिहासाच्या खाणा-खुणा,धबधबे,किल्ले सर्व प्रकारची पर्यटन स्थळे या राज्यात आहेत.

कन्नड या प्रमुख भाषेबरोबरच तमिळ,मलयालम,मराठी,कोकणी या बोलीभाषा काही प्रमाणात कर्नाटक मध्ये बोलल्या जातात.आहार,विहार व संस्कृती मध्ये विविधता पाहायला मिळते.कर्नाटक ची राजधानी असलेले बंगलुरू हे शहर ‘गार्डन सिटी’ म्हणून ओळखले जाते. पण भारताची “सिलिकॉन व्हॅली” म्हणूनही ओळखली जाते. आज आपण कर्नाटक मधील प्रसिद्ध अशा म्हैसूर पॅलेस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही वास्तूरचना हिंदू आणि मुघल शैलीचे मिश्रण असून घुमट, कमानी, प्रशस्त व्हरांडे ही याची वैशिष्ट्य आहेत.

म्हैसूर पॅलेस हा कर्नाटक मध्ये पर्यटकांद्वारा सर्वात जास्त भेट दिले जाणारे स्थळ म्हणजे म्हैसूर होय.म्हैसूर ला “पॅलेस सिटी ऑफ इंडिया” म्हणूनही ओळखले जाते.पूर्वी म्हैसूर हे कर्नाटक ची राजधानी म्हणून ओळखले जात होते.सध्या म्हैसूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून कर्नाटकची राजधानी बंगुलुरू पासून १४० कि.मी. दक्षिण-पश्चिमेला चामुंडी टेकड्यांवर वसलेले आहे.म्हैसूर मध्ये असलेले सात पॅलेस शहराची शोभा वाढवतात.भारतामध्ये ताजमहाल नंतर सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये म्हैसूर चे नाव येते.म्हैसूर मधील चामुंडेश्वरी मंदिर,जगमोहन महाल,सेंट फिलोमेना चर्च,वृंदावन गार्डन ही काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

राजे वडियार यांचा हा राजवाडा. त्यांचा अंबा पॅलेस आवर्जून पहावा असा. येथे आहे डॉल पॅव्हेलियन, युरोपियन -इंडियन शिल्पे, सेरेमोनियल वस्तू. दरबार हॉलमधील कोरीव खांब अप्रतिमच. वडियारांसाठी अतिशय अभिमानाची असलेली ही वास्तू म्हणजे रॉयल गोल्डन थॉर्न. त्यांच्या सार्वभौमत्वाचे हे प्रतीक. दसर्‍याचा उत्सव हा येथील मोठा उत्सव. त्या दिवशी राजाची आजही मिरवणूक काढली जाते.

आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत उत्तम स्थितीत जतन केला गेला आहे. दू. राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कोरीव कामाने नटलेले खांब, छते, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचे संग्रह अक्षरश: डोळे दिपविणारा. सुरुवातील हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला होता. मात्र, तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हा नवा राजवाडा १९११-१२ सालात पुन्हा बांधण्यात आला. इंग्लीश आर्किटेक्ट हेन्सी आयर्विन याने त्यासाठीचा आराखडा तयार केला होता.

loading image
go to top