
Passenger help for Ahmedabad flight suspension: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (SVPIA) १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 (बोईंग ७८७ ड्रीमलाइनर) चा अपघात झाल्याने सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या अपघातामुळे मेघानीनगर परिसरात मोठी जीवितहानी आणि नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सोशल मिडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. अशावेळी विमानतळावर असलेल्या प्रवाशांनी काय करावं हे जाणून घेऊया.