Air BNB: भारतात गेटवे ऑफ इंडियाचं नंबर वन, जगभरातील पर्यटकांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air BNB, gateway of india

Air BNB: भारतात गेटवे ऑफ इंडियाचं नंबर वन, जगभरातील पर्यटकांची पसंती

कोरोनानंतर प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, यांमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पर्यटकांची देशातील पर्यटनासाठी रीघ लागली आहे. परदेशासह, देशातील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. एअरबीएनबीच्या सध्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. (Air BNB, gateway of India)

एअरबीएनबीच्या आंतरराष्ट्रीय आणि देशातील पर्यटकांची मुंबईतील, गेटवे ऑफ इंडियाला भारतातील सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणून पसंती देण्यात आली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पर्यटकांसाठी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई अशी महानगरे भारतातील सर्वात लोकप्रिय स्थळे ठरली आहेत. भारताची माहिती शोधणाऱ्या देशांमध्ये कॅनडा, यूएई, यूके, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत. त्यामुळे देशातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

देशाने पर्यटनावरील निर्बंध शिथिल केल्याने अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येण्यास उत्सुक आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी सर्च केल्याप्रमाणे भारतातील एअरबीएनबी स्टेचा २०२१ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ६० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा सावरण्यात पर्यटन क्षेत्र हातभार लावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात 'लिव्ह एनीव्हेअर' या पद्धतीचे (रिमोट वर्किंग) ची सुविधा सहज उपलब्ध असून आणि डिजिटल विश्वाची व्याप्ती वाढल्याने पर्यटनाला चालना मिळत आहे. भारतात यूगव्ह (YouGov) तर्फे करण्यात आलेल्या एअरबीएनबी सर्वेक्षणानुसार, ८७ टक्के भारतीय काम करताना प्रवास, फिरणे किंवा इतर ठिकाणी जाऊन राहणे, अशा योजनांचा विचार करत आहेत.

या आकडेवारीतून हेही स्पष्ट झालंय की,‘रिव्हेंज ट्रॅव्हल’च्या माध्यमातून नेहमीच्या जगण्यातून काही वेगळे करण्यासाठी पर्यटक शहरी आयुष्यालाही पसंती देत आहेत. यासाठी ते डोंगराळ प्रदेश आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट देत आहेत. त्यामुळे नवी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय शहरे ठरली आहेत. देशातील गोवा, केरळ आणि पाँडिचेरीसारखी लोकप्रिय किनाऱ्यांना पर्यटक भेट देत आहेत.

हेही वाचा: World Vada Pav Day : खाता का नेता? चटपटीत वडापावची स्टोरी वाचा

आय अॅम फ्लेक्सिबल अशा टूल्सचा वापर करून पर्यटक नवी ठिकाणे आणि माहिती नसलेली ठिकाणे शोधत आहेत. यामुळे नव्या पर्यटनाची आणि अर्थव्यवस्थेचीही निर्मिती होत आहे. महानगरे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांना मिळणाऱ्या पसंतीत वाढ झाली आहे. देशभरातील स्थानिक होस्ट आणि भारत सरकारसोबत काम करून सध्याच्या पर्यटन क्रांतीचा लाभ स्थानिक समुदायांना घेता यावा यासाठी ते काम करत आहेत.

Web Title: Airbnb Report Gateway Of India Is Number Preferred By Tourists From All Over The World

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..