
History Of Dehu And Alandi Temple: दरवर्षी आषाढी वारीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हिंदू धर्मात या वारीला खुप महत्व आहे. यंदा १९ जूनपासून आषाढीवारीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक म्हणजे देहू-आळंदीचे मंदिर आहेत. या दोन्ही स्थळांचा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाशी अतूट नातं आहे. श्रद्धा, इतिहास आणि परंपरा यांचा संगम असलेल्या या स्थळांना केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर ते सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे.
देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असून आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी आहे. दरवर्षी देश विदेशातून भाविक या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी येतात. या दोन्ही मंदिराचा इतिहास आणि महत्व काय हे जाणून घेऊया.