तुलसी विवाहानंतर लग्न उकरायला सुरूवात होते. काही लोकांची लग्न लागली ही असतील. तर काहींची लवकरच पार पडणार आहेत. अशा नवविवाहीत वर-वधूला लग्नाआधी ग्रँड बॅचलर पार्टी देण्याचे जोरदार प्लॅनिंग सुरू असते. कारण, बॅचरल पार्टी ही लग्नाआधी मित्र-मैत्रिणींबरोबर मनमोकळं जगण्याची एक संधी असते.
आता तुमच्याही अनेक मित्रांची लग्न ठरली असतील. तर, तुम्हीही त्यांच्यासाठी बॅचरल पार्टी आयोजित करायला हवी. कारण, मित्राच लग्न झालं की तो जबाबदारीमध्ये व्यस्त होतो. त्याला जीवनातील एका नव्या टप्प्याचा सामना करावा लागतो. तेव्हा मित्रांना वेळ देणं कमी होतं. जर तुम्हीही मित्रांना अशी स्पेशल पार्टी देणार असाल तर ती कुठे द्यावी, परफेक्ट लोकेशन कसे शोधावे याबद्दल आपण माहिती घेऊयात. (Bachelorette Party)