बडोद्यातलं नैसर्गिक आकर्षण! सयाजी गार्डनची सुंदरता पाहून मन हरपून जाईल
Vadodara tourist place : वडोदऱ्यातील विशाल उद्यानाची माहिती, येथील जमिनीवरचे घड्याळ, म्युझियममधील ब्लू व्हेलचा प्रचंड सांगाडा, प्राणीसंग्रहालय आणि मिनी ट्रेनबद्दल जाणून घ्या.
Kamati Baug : सयाजी गार्डन हे बडोद्यातले एक सुंदर उद्यान आहे. हे प्रचंड मोठ्या आवारात पसरलेले आहे. याला ‘कामाटी बाग’ असेही म्हणतात, इथे अनेक प्रकारची फुलझाडे, वृक्ष वेली, काटेरी झुडपं, छोटे तलाव, त्यावर छोटे साकव आहेत.