भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी | Beach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीच

भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी

नागपूर : सुट्टीतील भटकंती म्हणून अनेकजण बीचची निवड करतात. समुद्रात मनसोक्त डुबले जाते. दंगामस्ती होते. परंतु, समुद्रस्नानामुळे केसांचा पोत बिघडतो. ते टाळण्यासाठी सोप्या ट्रिक्स वापरून केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.

समुद्रकिनारी वास्तव्य असेपर्यंत एक दिवसाआड केसांचे कंडिशनिंग करा.

समुद्रात जाण्यापूर्वी केस साध्या पाण्याने ओले करून घ्या. त्यामुळे केसांकडून खारं पाणी कमी प्रमाणात शोषले जाईल.

बीचवर जाताना स्कार्फ आणि हॅटचा वापर करा. यामुळे केसांचे नुकसान टाळणे शक्य आहे.

बीचवर दिवसभर उन्हात राहिल्यानंतर केसांवर ड्रायरचा वापर करणे योग्य नाही. ब्लो ड्रायरने सुकवण्याऐवजी केस नैसर्गिकरीत्या वाळवा.

बीचवर जाताना केसांसाठी कुठले प्रॉडक्ट योग्य ठरेल याचा अंदाज घ्या. केसांसाठी अँटी फ्रिजिंग प्रॉडक्ट आणि सन प्रोटेक्शन शँपूचा वापर करा. सीरमचा वापरही लाभदायक ठरेल.

टॅग्स :beach