National Park In South India : स्वर्गाहून सुंदर असलेल्या दक्षिण भारतातील ‘या’ राष्ट्रीय उद्यानांना नक्की द्या भेट

National Park In South India : दक्षिण भारताचे निसर्गसौंदर्य हे स्वर्गापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे, या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात.
National Park In South India
National Park In South Indiaesakal

National Park In South India : दक्षिण भारत हा निसर्गसौंदर्याने संपन्न असलेला भाग आहे. या दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांचा समावेश आहे. दक्षिण भारताचे निसर्गसौंदर्य हे स्वर्गापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे, या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात.

दक्षिण भारतातील हिल स्टेशन्स, प्रेक्षणीय स्थळे, चहाचे मळे, बागा, धबधबे इत्यादी अनेक ठिकाणांना तुम्ही भेट दिली असेल. परंतु, या ठिकाणांव्यतिरिक्त तुम्ही कधी दक्षिण भारतातील राष्ट्रीय उद्यानांना भेट दिली आहे का? जर नसेल दिली तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत या उद्यानांना भेट द्यायला नक्की जा.

कारण, दक्षिण भारतामध्ये स्थित असलेली ही राष्ट्रीय उद्याने एक्सप्लोअर करण्याची मजा काही औरच आहे. या उद्यानांमधील नजारा हा स्वर्गापेक्षा काही कमी नाही. या उद्यानांमधील विविध प्रकारचे वन्यजीव, निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहण्यासारखा आहे. आज आपण दक्षिण भारतातील काही राष्ट्रीय उद्यानांबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता

National Park In South India
Summer Travel : एप्रिलमध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' ठिकाणे, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

अनामलाई व्याघ्र राखीव उद्यान

दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. हे उद्यान पूर्वी इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर, या उद्यानाचे नाव अनामलाई व्याघ्र राखीव उद्यान असे करण्यात आले.

या उद्यानामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी आणि वनस्पती पहायला मिळतील. यासोबतच, तब्बल १०८ चौरस मीटवर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प तामिळनाडूच्या ४ व्याघ्र प्रकल्पांपैकीच एक आहे. या उद्यानामध्ये तुम्हाला वाघ, हत्ती, चित्ता, हरिण इत्यादी अनेक प्राणी पाहता येतील. या उद्यानामध्ये आल्यावर तुम्ही जीप सफारीचा आनंद घेऊ शकता. (Anamalai Tiger Reserve Park)

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान

दक्षिण भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये स्थित असलेले बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे एक लोकप्रिय उद्यान आहे. सुमारे ९० चौरस किमीमध्ये पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटकातील म्हैसूर साम्राज्याच्या महाराजांनी बांधले होते.

हे उद्यान खास करून नामशेष झालेल्या वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या सोबतच वन्यप्राण्यांसाठी देखील हे उद्यान प्रसिद्ध आहे. या उद्यानाला भेट दिल्यावर तुम्हाला हत्ती, वाघ, अस्वल, हरिण, काळवीट, बिबट्या, माकड, इत्यादी प्राणी जवळून पाहता येतील. विशेष म्हणजे हे उद्यान साग, चंदन आणि रोझवूडच्या झाडांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या उद्यानामध्ये आल्यावर तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. (Bandipur National Park)

National Park In South India
North East Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीतला आनंद द्विगुणीत करायचाय? मग, ईशान्य भारतातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com