Adventure sports: तुम्हालाही काही ऍडव्हेंचर करायचे आहे का? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adventure sports

Adventure sports: तुम्हालाही काही ऍडव्हेंचर करायचे आहे का? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

सध्या समुद्र, उंच डोंगर अशा ठिकाणी आता वॉटर स्पोर्ट्स, बंजी जंपिंग असे धाडसी खेळ खेळले जातात. भारतात ऍडव्हेंचर करण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत. स्कुबा डायव्हींग आणि रिव्हर राफ्टींग हे स्पोर्ट्स अल्पावधित लोकप्रिय झाले आहेत. जेव्हा तूम्हाला काही धाडसी करावे वाटेल तेव्हा भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

● वॉटर रिव्हर राफ्टिंग

उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात हिमालयाच्या मध्यभागी वसलेले ऋषिकेश हे भारतातील वॉटर रिव्हर राफ्टिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या शुद्ध पाण्यात रिव्हर राफ्टिंग सुरू झाल्याचे लोक सांगतात. ऋषिकेशमध्ये ९ ते ३६ किमी पसरलेले एकूण १३ रॅपिड्स आहेत.

● स्कूबा डायव्हिंग

स्कूबा डायव्हिंग ही भारतातील कमी वेळात लोकप्रिय होणारे वॉटर स्पोर्ट आहे. अंदमान-निकोबार बेटे हे जगातील स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी स्कूबा डायव्हिंग करून समुद्र सफारीचा उत्तम आनंद घेता येतो, असे पर्यटक सांगतात.

● ट्रेकिंग

ट्रेकिंगसाठी हिमाचल प्रदेश सर्वोच्च स्थानी आहे. ट्रेकिंग शिकणाऱ्यांसाठी चंद्रताल ते चरण घाटी ट्रेक हा सर्वोत्तम ट्रेकपैकी एक मानला जातो. हिमाचल हे सर्व प्रकारच्या ट्रेकर्ससाठी योग्य ठिकाण असून येथे थरारक ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.

● बंजी जंपिंग

सर्वात रोमांचक बंजी जंपिंग अनुभवासाठी गंगाकाठी वसलेले ऋषिकेश हे उत्तम ठिकाण मानले जाते.

● स्कीइंग

हिवाळ्यात जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल सारखी राज्ये बर्फाच्या दाट चादरींनी झाकलेली असतात. या काळात या ठिकानी स्कीइंगचा अनुभव घेता येतो.