वाघ पाहायचेत, ताडोबाला भेट द्या!

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा काळ हा जंगल सफारीसाठी अतिशय चांगला
Tourist ban for sound of tiger in tadoba
Tourist ban for sound of tiger in tadoba

लॉकडाऊन संपलाय, निर्बंध हटलेत, त्यामुळे अनेकांचे दैनंदिन आयुष्य सुरू झाले आहे. पण गेल्य दोन वर्षात कोरोनाच्या भितीमुळे फिरायलाही गेला नसाल ना! पण आता पर्यटनस्थळ खुली झाली आहेत. त्यामुळे अनेकजण फिरायला जायचा प्लॅन करत आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा काळ हा जंगल सफारीसाठी अतिशय चांगला असतो. म्हणूनच ताडोबा, पेंच, नवेगाव- नागझिरा नांदुरमधमेश्वर, जायकवाडी पक्षी अभयारण्य अशा काही ठिकाणी हमखास भेट देता येऊ शकते. वाघ बघण्यासाठी लोकां आवर्जून ताडोबाला जातात.

tadoba tiger reserve
tadoba tiger reservecanva

ताडोबा अंधारी व्राघ्र प्रकल्प

जंगलाच्या राज्याची शान बघायची असेल तर ताडोबाला भेट देणे मस्ट. चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे सर्वात जुने आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. 31 मार्च 1955 रोजी घोषित झालेले महाराष्ट्रातील हे पहिले उद्यान. रॉयल बॅंगाल टायगर बघण्यासाठी हे अभयारण्य प्रसिदध आहे. या अभयारण्याला ताडोबा हे नाव स्थानिक आदिवसींच्या देव तारू या नावावरून मिळाले. तर, या अभयारण्यातून प्रवाहीत होणाऱ्या अंधारी नदीवरून अंधारी वन्यजीव अभयारण्य असे नाव देण्यात आले. येथील वाघांची संख्या लक्षात घेऊन 23 फेब्रुवारी 1995 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. हिवाळ्यात या प्रकल्पाला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.

कसे जाल?

रेल्वे - वर्धा स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, किंवा मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूर गाठावे. तेथून महामंडळाची बस किंवा कारने थेट ताडोबात प्रवेश करता येतो.

रस्त्याने- धुळे- जळगाव मार्गे अकोला यवतमाळ चंद्रपुरूवरून ताडोबाला जाता येईल.

विमानाने- नागपूरपर्यंत विमानाने पोहोचून पुढे गाडीने जायचेय.

Tourist ban for sound of tiger in tadoba
भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी
Tadoba
Tadoba

काय पहाल?

ताडोबामध्ये वाघ, बिबटय़ा, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, चौसिंगा, गवा, जंगली कुत्री, नीलगाय, पट्टेरी तरस, रानमांजर, चांदी अस्वल ससा, भेकर असे अनेक प्राणी दिसतात. याशिवाय मोर, तुरेवाला कोतवाल, हळद्या, स्वगीय नर्तक, हरेल, रातवा, नवरंग, नीळकंठ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, मत्स्य गरूड अशाप्रकारचे अनेक पक्षीही आढळतात. या जंगलाला भेट दिल्यावरच तिथली मजा अनुभवण्यासारखी आहे.

ताडोबातील शुल्क

सोमवार ते शुक्रवार - 4 हजार रूपये

शनिवार - रविवार- 8 हजार

जिप्सी चार्जेस- 2200 रूपये

गाईड- 300 रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com