esakal | मनालीला फिरायला जाताय? तर 'ही' ठिकाणे नक्की पहा
sakal

बोलून बातमी शोधा

manali

मनालीला फिरायला जाताय? तर 'ही' ठिकाणे नक्की पहा

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

मनाली: हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये मनालीचा नंबर पहिला लागतो. कारण मनालीतील निसर्ग सौंदर्य, बाजारपेठ, तिथलं वातावरण आणि इतर अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे देशातील तसेच परदेशातील अनेक पर्यटक मनालीला पर्यटनाला जाण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही मनालीला पर्यटनाला गेलात तर तिथं जवळच असणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जी तुम्ही नक्की पाहिली पाहिजेत. चला तर जाणून घेऊया मनालीच्या जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबद्दल...

नग्गर वाडा-

मुख्य शहरापासून सुमारे 21 कि.मी. अंतरावर, मनालीचा नग्गर किल्ला कोणत्याही प्रसिद्ध पर्यटनस्थळापेक्षा कमी नाही. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने भरभरलेले असून ते अतिशय शांतही ठिकाण आहे. इथं बर्‍याचदा असे पर्यटक येतात ज्यांना शहरातील गर्दीपासून काही दूर ठिकाणी फिरायला आवडते. ही वास्तू कुलूचा राजा सिद्धसिंह यांनी बांधली होती. या किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या जंगलामुळे या ठिकाणाची शोभा वाढते.

नग्गर वाडा

नग्गर वाडा

वशिष्ठ गाव-

मनालीच्या जवळ असणारे हे ठिकाण अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक आहे. राव नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण अनेक आश्चर्यकारक नजाऱ्यांसाठी ओळखले जाते. इथं अनेक तलाव आणि झरे देखील आहेत, ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. यांना ऋषि वशिष्ठ यांचे स्नानगृह मानले जात होते. हे ठिकाण शहरापासून दहा ते बारा किलोमीटरवर आहे.

वशिष्ठ गाव

वशिष्ठ गाव

मणिकरण-

मनालीच्या आसपासच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी हे एक स्थान आहे. मनालीपासून हे ठिकाण 80 किलोमीटरवर आहे. हे ठिकाण अतिशय पवित्र मानले जाते. पार्वती नदीच्या काठावर वसलेले हे स्थान मणिकरण गुरुद्वारासाठीही प्रसिद्ध आहे. या गुरूद्वाराच्या शेजारी असलेल्या शिवमंदिराबद्दल असे म्हणतात की, माता पार्वती आणि भगवान शिव यांनी 11 हजाराहून अधिक वर्षे तपश्चर्या केली.

मणिकरण

मणिकरण

कोठी गाव-

ज्यांना कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा असेल त्या लोकांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 25 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर स्थित आहे. हे स्थान सुंदर पर्वत आणि हिमनदींसाठी प्रसिद्ध आहे. इथून व्यास नदी वाहते. हे ठिकाण मनालीपासून 15 किलोमीटरवर आहे.

कोठी गाव

कोठी गाव

loading image
go to top