esakal | कुल्लूमध्ये फिरायला जायचा प्लॅन आहे? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

kullu

हिमालयात फिरायला जायचा प्लॅन आहे? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अनेकजण फिरायला जायचं म्हटलं की कुल्लू-मनाली (kullu-manali) हे ठिकाण सूचवतात. परंतु, याठिकाणच्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांबाबत (best tourism places in kullu) फार कमी लोकांना माहिती आहे. बियास नदीच्या काठावीरल हे ठिकाण सौंदर्याच्या दृष्टीने लडाखपेक्षा कमी नाही. राफ्टिंग, पर्वतारोहण, पॅराग्लाइडिंग आणि ट्रेकिंग इत्यादींचा आनंद याठिकाणी घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया अशा स्थळांबद्दल (best tourist places to visit in kullu of himalaya) -

हेही वाचा: मुलांसोबत फिरायला जायचंय? मग 'या' तीन संग्रहालयाला नक्की भेट द्या

खीरगंगा -

मुख्य शहरापासून सुमारे 23 कि.मी. अंतरावर असून ही एक लहान जागा आहे. पण, या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे. पर्वतांच्या मध्यभागी असलेले हे स्थान त्याच्या विहंगम दृश्यासाठी फार प्रसिद्ध आहे. सभोवतालचे हिरवेगार वन आणि सूर्यास्त देखील येथून पाहता येतो. खीरगंगा येथे असे अनेक धबधबे आहेत, जिथे आपल्याला आनंद घेता येईल. तसेच तुमच्या जोडीदारासोबत जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.

कैसरधर -

कुल्लूमधील एक न ऐकलेले ठिकाण म्हणजे कैसरधर. उंच देवदार वृक्षांनी वेढलेले हे ठिकाण फार सुंदर आहे. हे ठिकाण मुख्य शहरापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. हे ठिकाण ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. याला कैसरधर व्हॅली असेही म्हणतात. कैसरधर ठिकाणाहून थोड्या अंतरावर एक गाव आहे, तेथील स्थानिक परंपरा तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळते

सुलतानपूर पॅलेस -

मैदानाच्या मध्यभागी असलेला सुलतानपूर पॅलेस खूप सुंदर आहे. हा वाडा रुपी पॅलेस म्हणूनही ओळखला जातो. आपल्याला कुल्लूमध्ये मध्ययुगीन वास्तुकला जवळून पाहायची असल्यास आपण येथे जाऊ शकता. या राजवाड्याभोवती हिरवळ आणि उंच पर्वत आहेत.

चंद्रखानी पास -

समुद्रसपाटीपासून 13 हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेले हे ठिकाण लोकप्रिय ट्रॅकपैकी एक आहे. या ठिकाणाहून पीर पंजाल शिखराच्या दृश्यांचा आनंद लुटता येतो. चंद्राच्या आकारामुळे या परिसराला चंद्रखानी म्हणतात. बर्फवृष्टीच्यावेळी या ठिकाणचे रस्तेही काही वेळा बंद असतात. याशिवाय तुम्ही नागगर शहर, भुंतर आणि कुल्लूमधील पवित्र हनोगी माता मंदिर देखील पाहू शकता. याठिकाणी आपण राफ्टिंग, पर्वतारोहण, पॅराग्लाइडिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

loading image