Homestay And Hotel: हे होमस्टे अन् हॉटेल सारखंच असतं काय हो? ट्रिपला जाण्यापूर्वी जाणून घ्या

सध्या हॉटेल सोबत आणखीन एक शब्द खूप बोलला जातो आहे. तो म्हणजे होमस्टे
Homestay And Hotel travel tips
Homestay And Hotel travel tipsesakal

Homestay And Hotel Travel Tips : उद्या रविवार, सुट्टीचा वार सगळेच कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याच्या प्लॅनिंग मध्ये असतात. काही लोकं आपल्या फॅमिली सोबत जातात तर काही लोकं आपल्या मित्रांसोबत. जेव्हाही आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा कुठेही फिरायला जातो आपण राहण्यासाठी एक जागा बघतो.

यात ही जागा जर आपल्या मनासारखी मिळाली तर मग काही विचारायलाच नको. सध्या हॉटेल सोबत आणखीन एक शब्द खूप बोलला जातो आहे. तो म्हणजे होमस्टे. अर्थात हा शब्द आपण ऐकला नाहीये असं नाहीये पण सध्या तो ट्रेंडमध्ये आहे.

Homestay And Hotel travel tips
Travel Tips : आंध्रप्रदेशची नवी राजधानी आहे City of Destination, असा करा ट्रीपचा प्लॅन

पण जर तुम्हाला विचारल की होमस्टे आणि हॉटेलमध्ये काय फरक आहे, तर तुमचे उत्तर काय असेल? यातला नक्की फरक शोधणे अनेकांना अशक्य होते. तुम्हालाही याबद्दल संभ्रम असेल तर आज तो क्लियर करुन घ्या.

Homestay And Hotel travel tips
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

हॉटेल म्हणजे काय? (Homestay And Hotel)

हॉटेलबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते होमस्टेपेक्षा वेगळे आहे. हॉटेलमध्ये एक नाही तर अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ, तुम्ही हॉटेलमध्ये राहता तेव्हा तुमच्याकडे रुम सर्व्हिस, रेडी फूड किंवा अनेकदा तेही बनवता येतं अशा अनेक सुविधा असतात.

हॉटेलमध्ये या सुविधांशिवाय पूल, फिटनेस सेंटर, गेम्स आणि रेस्टॉरंट्सही असतात. एक प्रकारे, कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला 24 तास सुविधा मिळतात. तुम्ही कधीही कॉल करुन रुम सर्व्हिसमधून कोणतेही खाण्यापिण्याची ऑर्डर देऊ शकता. तुम्ही कधीही हॉटेलमध्ये चेक इन किंवा चेक आउट करू शकता.

Homestay And Hotel travel tips
Travelling Tips : प्रेग्नेंसीत प्रवास करायचाय? या टिप्स फॉलो करा अन् बिंधास्त रहा!

होमस्टे म्हणजे काय? (Homestay And Hotel)

एखाद्या हॉटेलप्रमाणे तुम्ही होमस्टेमध्ये सहज राहू शकता, पण इथे उपलब्ध सुविधा कमी असू शकतात. अनेक होमस्टेमध्ये चहा-कॉफी स्वतः बनवता येते. होमस्टेमध्येही काही वेळा स्वतःहून काही फास्ट फूड बनवण्याची सोय असते.

होमस्टेच्या मालकाची इच्छा असल्यास तो फास्ट फूड बनवण्यासाठी कॉफी, चहाची भांडी इत्यादी देऊ शकतो. हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडमधील अनेक होमस्टेमध्ये पर्यटकांना या सर्व सुविधा दिल्या जातात. एक प्रकारे, घरापासून दूर राहूनही तुम्ही तुमच्यासाठी सहज काहीतरी बनवू शकता. एकंदरीत, घरातून एखाद्या ठिकाणी गेल्यावरही होमस्टे तुमच्यासाठी घरासारखाच असतो.

Homestay And Hotel travel tips
Travel Tips : बॉलीवूडचे भक्त आहात तर या खास डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

बेड किती असतात?

हॉटेलच्या खोलीत एक किंवा दोनपेक्षा जास्त बेड नसतात, पण अनेक होमस्टेच्या एका खोलीत तीन ते चार बेड असतात. बर्‍याच ठिकाणी, होमस्टेमध्ये खोली शेअर करावी लागते, फक्त, बेड शेअर करायचे नाही. म्हणूनच जवळजवळ प्रत्येक होमस्टेमध्ये लॉकरची सुविधा असते जिथे पर्यटक त्यांचे सामान सुरक्षितपणे ठेवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com