Best Trolley Bags : जास्त स्पेस असलेल्या ट्रॅव्हलिंग बॅग्सवर लोकांच्या उड्या; लवकर खरेदी करा!

या सर्वात जास्त खरेदी केलेल्या आणि प्रसिद्ध ट्रॉली बॅग आहेत
Best Trolley Bags
Best Trolley Bagsesakal

व्हेकेशन ट्रिप, वर्क ट्रिप किंवा हनिमून ट्रिपसाठी कुठेही जाण्यापूर्वी सूटकेसमध्ये कोणते कपडे ठेवावेत हा सर्वात मोठा प्रश्न असतो. कारण, कमी जागेत जास्त कपडे नेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. पण, अती लोड झाल्याने कधी त्या बॅग आपली फजिती करतात. तर कधी इच्छा असूनही अधिक खरेदी करता येत नाही.

लोक ट्रिपचे नियोजल करण्याआधी आपल्याकडे कोणत्या बॅग आहेत, त्यात किती सामान बसू शकते याचा नक्की विचार करतात. कारण, बॅग पॅक करताना ती ओव्हरलोड होणार नाही ना? याची काळजी घेतली जाते. तसेच, प्रवासात बॅगेचे ओझे उचलून घाम फुटणार नाही ना, याचाही विचार करून बॅगेची निवड केली जाते.

त्यामूळे येणाऱ्या उन्हाळ्यात ट्रिपचे प्लॅन करणार असाल तर कमी जागेत जास्त सामान बसवणाऱ्या आणि वापरण्यासही सुटसूटीत असलेल्या काही बॅग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या खास प्रवासी बॅग्स लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Best Trolley Bags
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅग्स परवडणाऱ्या किंमतीत असून त्या अनेक वर्ष टिकतात. याशिवाय या ट्रॉली बॅग्समध्ये वेगळे कप्पेही देण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचे अंडरगारमेंट्स, मेकअप प्रॉडक्ट्स, बॉडी केअर प्रॉडक्ट्स इत्यादी चांगल्या प्रकारे ठेवू शकता. हे बॅग्स अमेरिकन टुरिस्टर, सफारी स्कायबॅग्ज, अॅरिस्टोक्रॅट यांसारख्या लोकप्रिय ब्रँडचे आहेत. या सर्वात जास्त खरेदी केलेल्या आणि प्रसिद्ध ट्रॉली बॅग आहेत, चला जाणून घेऊया त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल.


टूरिस्ट ब्लॅक ट्रॉली

अमेरिकन टुरिस्टर या प्रसिद्ध ब्रँडच्या प्रवासी बॅग पॉलीप्रॉपिलीन मटेरियलपासून बनवलेल्या आहेत. ही खूप मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी ट्रॅव्हल बॅग आहे. त्यात तुम्ही भरपूर कपडे ठेवू शकता आणि ती कॅरी करणेही सोपे आहे. त्यात तूम्हाला सोयीस्कर होतील असे अनेक कप्पे आहेत. ज्यात तूमच्या अनेक गोष्टी बसू शकतात.

अमेरिकन टूरिस्ट ब्लॅक ट्रॉलीची किंमत – 3,299

Best Trolley Bags
Travelling Tips : प्रेग्नेंसीत प्रवास करायचाय? या टिप्स फॉलो करा अन् बिंधास्त रहा!

पेंटागॉन ट्रॉली बॅग
ही वॉटरप्रूफ लगेज बॅग आहे. ही सर्वोत्कृष्ट ट्रॉली बॅग असून तिला चार चाके आहेत. ज्यामुळे ती प्रवासात सहज कुठेही नेता येते. निळसर रंगात आलेली ही पेंटागॉन ट्रॅव्हल बॅग दिसायला एकदम स्टायलिश आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही ती सोयिस्कर आहे. पॉली कार्बोनेटपासून बनवलेल्या या ट्रॅव्हल बॅगवर स्क्रॅच किंवा कोणत्याही प्रकारचे डाग दिसत नाहीत. तसेच हि बॅग दीर्घकाळ टिकणारी आणि मजबूत असते.

पेंटागॉन ट्रॉली बॅग किंमत -  2,299

Best Trolley Bags
Travel Tips : बॉलीवूडचे भक्त आहात तर या खास डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

स्कायबॅग्ज ट्रॉपर ट्रॉली बॅग

या स्टायलिश लगेज बॅग्ज आहेत. जर तुम्हाला ट्रेंडी लूकसह सोशल मिडीयावर स्टोरी टाकायच्या असतील तर हि बॅग तूमच्या स्टोरीचे लाईक्स नक्की वाढवेल. ही हाय क्वालिटी हार्ड केस लगेज बॅग आहे. त्याची बाहेरील कव्हर पॉली कार्बोनेटपासून बनलेले आहे.

क्रॉस स्ट्रॅपची सुविधा आहे. ज्यामुळे तुमचे सामान खूप सुरक्षित असेल. ही बॅग स्टायलिश आणि जास्त स्पेस देणार आहे. त्यामूळे कमी जागेत तूमचे जास्त सामान यात बसू शकते.

स्कायबॅग्ज ट्रॉपर ट्रॉली बॅग किंमत - 3399

Best Trolley Bags
Maternity Bag Packing Tips : प्रसुतीसाठी हॉस्पीटलमध्ये जाताना बॅगेत काय काय ठेवाल ?

ट्रॉली बॅग कशी साफ करावी

तुमची ट्रॉली बॅग पूर्णपणे रिकामी करा. कोमट पाण्यात मीठ घालून त्यात कपडा बुडवून पिळून घ्या. आता या कापडाने तुमची ट्रॉली बॅग स्वच्छ पुसून काढा. यानंतर ट्रॉली बॅग उन्हात ठेवा.पूर्ण कोरडी झाल्यावरच ती वापरायला घ्या.

Best Trolley Bags
Kshiti Jog : क्षितीच्या बॅगेत नेमकं आहे काय? : What’s in my Bag

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com