Maternity Bag Packing Tips : प्रसुतीसाठी हॉस्पीटलमध्ये जाताना बॅगेत काय काय ठेवाल ?

या टिप्सनी तूमचा ताण थोडा हलका होऊ शकतो
Maternity Bag
Maternity BagEsakal

प्रसुती हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामूळे गोड बातमी समजल्यापासून ते प्रसुती होईपर्यंत ती स्वत: तर एका वेगळ्याच आनंदात असते. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यही आनंदात असतात. प्रसुती होईपर्यंत तिला अनेक सल्ले दिले जातात. तिची प्रत्येक बाबतीत काळजी घेतली जाते.  

घरातील जाणकार महिला तिला प्रसुतीसाठी मनाने तयार करत असतात. तर, काही नुकत्याच आई बनलेल्या मैत्रिणी तिला हॉस्पिटलमध्ये जाताना काय सोबत न्यायचे हे सांगत असतात. तरीही काही महत्त्वाच्या वस्तू राहतात. तूम्हालाही काही विसरू नये याची काळजी वाटत असेल तर त्यासाठी तूम्ही प्रसुतीसाठी घरातून हॉस्पिटलमध्ये निघण्यापुर्वी तुमची मॅटर्निटी बॅग आधीच तयार ठेवू शकता. गरजेच्याच गोष्टी बॅगेत असणे खूप महत्वाचे आहे. या काही टीप्सने तूमच्या बॅग भरण्याचा ताण कमी होईल.

maternity bag
maternity bag
Maternity Bag
खेलेगा इंडिया... : हार्ट रेट आणि व्यायाम

सैल कपडे - प्रसूतीवेळी गाऊन घालण्यास सांगितला जातो. एखादा हलका व सैल कपड्यांचा जोड तुमच्यासोबत असू ठेवा. तसेच, बॅगमध्ये फिडींग ब्रा ठेवा. त्यामूळे स्तनपान करणे सोपे जाते.

गजचेच्या वस्तू विसरू नका - प्रसूतीनंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यता असते. त्यामूळे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मॅटर्निटी बॅगेत टॉवेल, हेअर ब्रश, टुथपेस्ट, टुथब्रश, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिश्नर,टिश्यू पेपर्स, छोटे नॅपकीन, रूमाल अशा गोष्टी ठेवा. तुमच्यासोबत हलक्या व फ्लॅट स्लीपर सोबत ठेवा.

Maternity Bag
Actress Fitness Secrete : 'या' उपायांनी फीगर मेंटेन करतात अनुष्का, दीपिका, प्रियंका...

उबदार ब्लॅंकेट, स्वेटर - सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामूळे हिवाळ्यात मातेची आणि बाळाची विशेष काळजी घेतली जाते. हॉस्पीटलमध्ये जाताना स्वेटर, डोक्यासाठी स्कार्फ सोबत घ्या. त्याचसोबत ब्लॅंकेटही सोबत ठेवा.

अंडरवेअर्स - सी-सेक्शन डिलिव्हरी दरम्यान टाके येतात. अशा परिस्थितीत नेहमी घातले जाणारे अंडरवेयर उपयोगी पडतीलच असं नाही. त्यामुळे आरामदायक अंडरवेयर तयार ठेवा.

पॅड्स - प्रसूतीनंतर काही दिवस मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामूळे बॅगेत पॅड्स नक्की ठेवा.

Maternity Bag
Winter Care Tips : हिवाळ्यात त्वचेला हेल्दी करण्यासाठी घरच्या घरीच तयार करा, कॉफी फेस पॅक

हॉस्पिटलची फाईल, मेडिकल कार्ड – हॉस्पिटलमध्ये अचानक दाखल होण्याची वेळ आली तर प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तुमची हॉस्पिटलमधील फाईल आणि आय-डी कार्ड बॅगेत भरून ठेवा. तुमचा हेल्थ इन्शूरन्स आणि त्याचे मेडीकल कार्डदेखील तुम्हाला अॅडमीट होताना जवळ ठेवा.

एखादा चांगला ड्रेस किंवा साडी - सध्या बाळाचे आणि मातेचे स्वागत दणक्यात करण्याची नवी परंपरा सुरू झालीय. त्याचे व्हिडीओ फोटो शूटींगही केले जाते. अशावेळी तूम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर एखादा चांगला फंक्शनल ड्रेस घालून घरी जाऊ शकता.

बाळासाठी महत्त्वाच्या वस्तू

बाळासाठी डायपर, वाईप्स - नवजात बाळाला दिवसभरात कमीत कमी दहा ते बारा वेळा डायपर बदलावे लागतात. यासाठी नवजात बाळासाठी असलेले डायपर तुमच्या बॅगेत ठेवा. बाळाला स्वच्छ करण्यासाठी निर्जंतूक असलेल्या बेबी वाईप्स वापर जरूर करा.

सूती कपडे - बाळ जन्मल्यानंतर घातले जाणारे कपडे आरामदायक लंगोट, झबलं, टोपडं आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा.

वाटी चमचा - प्रसूती झाल्यानंतर लगेचच मातेला दूध येते. पण, काही मातांच्या बाबतीत असे होत नाही. त्यांना चार दिवस उलटले तरी दूध येत नाही. त्यावेळी डॉक्टर बाळाला वाटीने पावडर दूध किंवा गायीचे दूध चमच्याने किंवा बाटलीने द्य़ायला सांगतात. अशावेळी दूधाची बाटली किंवा वाटी चमचा सोबत ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com