Tourism : देशाचे ऐक्य दाखवणारे भारत मातेचे मंदिर तूम्ही पाहिले का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism : देशाचे ऐक्य दाखवणारे भारत मातेचे मंदिर तूम्ही पाहिले का?

Tourism : देशाचे ऐक्य दाखवणारे भारत मातेचे मंदिर तूम्ही पाहिले का?

भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतात प्रत्येक गल्लीत एखादे तरी मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा चर्च आहे. या सर्व मंदिरांमध्ये एक मंदिर वेगळे असून आपल्या देशाचे ऐक्य दाखवणारे हे मंदिर आहे. कारण, या मंदिरात कोणत्याही धर्माचे लोक प्रवेश करू शकतात. इतके खास वैशिट्य असलेले हे मंदिर भारत मातेचे असून ते वाराणसीमधील महात्मा काशी विद्यापीठ परिसरात आहे.

भारत पारतंत्र्यात असताना वाराणसीमधील शिवप्रसाद गुप्त यांनी हे मंदिर बांधले. दुर्गा प्रसाद खत्री या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची स्थापना झाली आहे. या मंदिराचे उद्घाटन २५ ओक्टोंबर १९३६ रोजी महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले आहे. या मंदिरात कोणत्याही देवाची मूर्ती नाही. सर्व धर्माचे लोक येऊ शकतील असे एक मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता. ते स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना छुप्या पद्धतीने मदत करत होते.

हेही वाचा: Tourist : झणझणीत ठसक्याची चव चाखण्यासाठी एकदा कोल्हापूरला भेट द्या..

विधवा आश्रमातून मिळाली प्रेरणा

शिवप्रसाद गुप्त मुंबई भेटीवर आले असताना पुण्यात महर्षी कर्वे यांच्या विधवा आश्रमाला भेट देण्यासाठी आले. या आश्रमात त्याकाळी मातीचा भारत मातेचा नकाशा तयार केला होता. या नकाशात नद्या, पर्वत असे उंच सखल भागही अतिशय चांगल्या प्रकारे दाखविले गेले होते. त्यातून गुप्त याना प्रेरणा मिळाली. हिंगणे आश्रमातील भारताचा नकाशा पाहिल्यावर त्यांनी तसेच मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रत्यक्षात बांधले.

भारताचा संगमरवरी नकाशा

या मंदिरात संगमरवरात कोरला गेलेला भारतमातेचा नकाशा आहे. त्यातही डोंगर, नद्या, समुद्र दाखविले गेले आहे. ३१.२ फुट बाय ३०.२ फुट आकाराचा हा भव्य नकाशा ११ इंची ७६२ तुकड्यातून तयार केला गेला आहे. या नकाशात अफगाणिस्थान, बलुचिस्तान, तिबेट, म्यानमार, लंका, मलय यांचाही काही भाग दाखविला गेला आहे.

हेही वाचा: Viral Video : पद्मश्री विजेत्या पुजारी यांना हॉस्पिटलमध्ये करायला लावला डान्स

या मंदिराभोवती विशाल उद्यान असून मंदिरात अनेक शिलालेख आहेत. या मंदिराच्या दरवाज्यावर वंदे मातरम हे गीत कोरले गेले आहे. वाराणसी शहरापासून १ किलोमीटर अंतरावर तर, वाराणसी विमानतळापासून २२ किलोमीटर हे मंदिर आहे. इथून बस स्थानकही जवळच आहे. त्यामुळे तूम्ही वाराणसीला जायची प्लॅन करत असाल तर मनात देशभक्ती जागवणाऱ्या या मंदिराला एकदा नक्की भेट द्या.

Web Title: Bharat Mata Mandir Varanasi Timings Entry Fee Best Time To Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..